Headlines

‘रोटरी’ स्वप्नांना कृतीत रूपांतरित करणारी चळवळ:रोटरी क्लब ऑफ करकंबचा पदग्रहण, पुरस्कार वितरणप्रसंगी जयेश पटेल यांचे प्रतिपादन




करकंब रोटरी ही संस्था नाही. आपल्या स्वप्नांना कृतीत व कृतीला प्रभावात रूपांतरित करणारी जागतिक चळवळ असल्याचे डिस्ट्रिक गव्हर्नर रो. जयेश पटेल यांनी आपल्या मनोगतात सांगितले. रोटरी क्लब ऑफ करकंबच्या पदग्रहण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून रो. शार्दुल शहा व सचिवपदी लक्ष्मण जाधव यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली. यावेळी असिस्टंट गव्हर्नर रो. साजिकराव पाटील, असिस्टंट गव्हर्नर डॉ. अक्षय मोरे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी ११ आदर्श शिक्षकांना राष्ट्रीय शिल्पकार, ११ विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व्यक्तींना “श्रम प्रतिष्ठा पुरस्कार तसेच रक्षाबंधन स्पर्धेतील सुंदर फोटो विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी रो. असि.गव्ह. साजिकराव पाटील, असि. गव्ह. डॉ. अक्षय मोरे, नूतन अध्यक्ष यांनीही आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन रो. प्रा. किसन सलगर यांनी केले. आभार रो. बाळासाहेब शिंगटे यांनी मानले. सचिन चरपे (गुणवंत कामगार), राधिका इदाते ( महिला सक्षमीकरण), सुभाष परदेशी ( औद्योगिक), डॉ. अरुण मेणकुदळे ( वैद्यकीय), सुरेखा सुरेश सावंत ( आदर्श महिला शेतकरी), हभप श्रीकांत आरोळे ( आध्यात्मिक), रत्नमाला भालेकर ( आदर्श अंगणवाडी सेविका), सृष्टी जगताप, गौरी सुतार व ज्ञानेश्वर देवकाते (क्रीडा क्षेत्र). आदर्श शिक्षक पुरस्कार सारीका शेंडगे (जि. प. प्रा. शाळा,मेंढापूर), सीमा रोंगे व्यवहारे वस्ती नं. १, शबाना मुलाणी (मुले नं. १), रवींद्र झमकडे (न्यू इंग्लिश स्कूल,करकंब), अश्विनी शिंगटे ( रामभाऊ जोशी हायस्कूल), सोनाली पोतदार ( मुली नं. २), मीना नामदे (अनवते वस्ती), जयश्री ढोबळे (अमोल पब्लिक स्कूल), मधुकर लोकरे ( एस. पी. प्रशाला, करकंब), ज्ञानेश्वर चव्हाण ( तुळशी). ज्योती अकोबा (प्रथम), अनुज व अधिरा शिंदे ( द्वितीय), गणेश व ज्ञानेश्वर दुधाणे ( तृतीय), कार्तिक अनिकेत इदाते (चतुर्थ), सिद्धी व अजिंक्य जाधव, पवन व स्वामिनी तिटंबे (उत्तेजनार्थ).



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *