दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता मोठे कायदेशीर आणि राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख य
.
7 दिवसांत माफी न मागितल्यास फौजदारी कारवाईचा इशारा
सतीश सालियन यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये अत्यंत कडक कायदेशीर भूमिका मांडली आहे. आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे सतीश सालियन यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेला आणि सामाजिक विश्वासार्हतेला गंभीर धक्का पोहोचला आहे. त्यामुळे दोघांनीही 7 दिवसांच्या आत जाहीरपणे माफी मागावी. ही माफी केवळ औपचारिक न राहता सर्व प्रमुख मुद्रित, दूरचित्रवाणी आणि डिजिटल माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावी.
500 कोटींची नुकसानभरपाई
जर 7 दिवसांत जाहीर माफी मागितली नाही, तर दोघांविरुद्ध 500 कोटी रुपयांच्या दिवाणी नुकसानभरपाईचा दावा ठोकण्यात येईल. तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 356 (मानहानी) अंतर्गत फौजदारी खटला दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार राखून ठेवण्यात आला असल्याचेही या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
आदित्य ठाकरे आणि वकिलांच्या दाव्यांवर थेट आक्षेप
नोटीसमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रामाणिक संघर्षाला आदित्य ठाकरे यांनी पद्धतशीरपणे ‘राजकीय हेतूने प्रेरित’ असल्याचे चित्र उभे करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
सीबीआय क्लीन चिटचा दावा खोटा
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने यापूर्वीच तपास पूर्ण करून आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली आहे, असा दावा ठाकरे यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता. मात्र, 2 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयात सीबीआयने यापूर्वी असा कोणताही तपास केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा खोटा दावा सतीश सालियन यांची दिशाभूल करणारा आणि बदनामी करणारा ठरल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरही निशाणा
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेवर बोट ठेवत अनिल देशमुखांच्या विधानाचा नोटीसमध्ये सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. 23 मार्च 2025 रोजी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर वक्तव्य करताना ‘दिशा सालियन प्रकरण हे आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचे राजकीय षडयंत्र आहे’, असा दावा केला होता. एका दुर्दैवी पित्याच्या न्यायाच्या मागणीला थेट षडयंत्र ठरवून देशमुखांनी सतीश सालियन यांच्या चारित्र्यावर आणि लढ्यावर संशय निर्माण केला, ज्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला. हे सर्व आरोप पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारे आणि जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूने केले गेले असल्याचे सालियन यांनी म्हटले आहे.
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर कारवाईला वेग
सतीश सालियन यांच्या याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच या प्रकरणात एफआयआर (FIR) नोंदवून केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) सखोल तपासाचे निर्देश दिले आहेत. सीबीआयचा तपास सुरू असतानाच, आता थेट आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांना 500 कोटींच्या अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. पुढील 7 दिवसांत दोन्ही नेते या नोटीसला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
————-
हेही वाचा….
अफवांचा धुरळा उडवणं बंद करा!: राजकीय हेतूने चारित्र्यहननाचा प्रयत्न; दिशा सालियन प्रकरणातील नव्या FIR नंतर आदित्य ठाकरेंचा संताप

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने 13 सप्टेंबर रोजी नव्याने एफआयआर दाखल केल्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या नव्या एफआयआरमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांसारख्या बड्या राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणातील तपासाच्या हालचाली आता जलदगतीने सुरू झाल्या असून, सीबीआयने या केसचा तपास आपला ‘हुकमी एक्का’ मानल्या जाणाऱ्या गोल्ड मेडलिस्ट महिला अधिकारी एसपी सीमा पाहुजा यांच्याकडे सोपवला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी