![]()
गुजरात दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीच अचानक गंभीर तांत्रिक बिघाड झाला. मात्र, वैमानिकाच्या तत्परतेमुळे मोठा धोका टळला. खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा यंत्रणेने शिंदेंना वडनगरहून रस्ते मार्गाने अहमदाबादकडे रवाना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वडनगर येथे आयोजित राष्ट्रव्यापी ‘सेवा संकल्प अभियाना’च्या शुभारंभानंतर शिंदे अहमदाबादसाठी उड्डाण करणार होते. त्याच वेळी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. हवेतील थरार : महाराष्ट्रातील बड्या नेत्यांचे हेलिकॉप्टर अपघात अन् तांत्रिक बिघाडांचा घटनाक्रम
Source link
पुन्हा बिघाड:एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ऐन उड्डाणावेळी तांत्रिक बिघाड; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला