![]()
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत धोकादायक ठरलेल्या २.५५ किमी लांबीच्या राहुड घाटात गेल्या ५ वर्षांत २० हून अधिक निष्पाप प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तीव्र चढ-उतार आणि धोकादायक वळणांमुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या निकषांनुसार
.
या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव त्यांनी नवी दिल्ली येथे ‘नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया’ चे मुख्य महाव्यवस्थापक रजनीश कपूर यांची भेट घेऊन सादर केला. या घाटात अवजड वाहने अनियंत्रित होऊन सातत्याने अपघात घडत असल्याने अल्पकालीन उपायांपेक्षा ६ पदरी फ्लायओव्हर किंवा व्हायाडक्ट हाच अपघातांवर एकमेव शाश्वत पर्याय असल्याचे आमदार डॉ. आहेर यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच या कामाला तातडीने मंजुरी व आवश्यक निधी देण्याची मागणी केली. घाटात एखादा जरी अपघात झाला, तरी मनमाड, मालेगाव, चांदवड, नाशिक आणि धुळे या ५ जिल्ह्यांतील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते; हा प्रस्तावित उड्डाणपूल झाल्यास ही कोंडी कायमची सुटण्यास मदत होणार आहे. नवी दिल्लीतील या बैठकीत आमदार डॉ. राहुल आहेर यांच्यासमवेत ॲड. विलास देशमाने आणि जि. प. माजी सदस्य प्रशांत देवरे उपस्थित होते.दरम्यान, संबंधित मंत्रालयाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच तांत्रिक पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
राहुड घाटातील प्रवास सुरक्षित व्हावा आणि निष्पाप लोकांची जीवितहानी कायमची थांबावी यासाठी अंतिम मंजुरी मिळेपर्यंत हा पाठपुरावा असाच सुरू राहील. – डॉ. राहुल आहेर, आमदार, चांदवड-देवळा