Headlines

परतीच्या पावसाने 10 टक्के भरपाई, तूट मात्र 20% राहण्याची शक्यता:3 तालुके “रेड”, तर 8 “येलो” झोनमध्ये, अकोले तालुक्यात भरभरून बरसला‎



शहरासह जिल्ह्यात गुरुवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली, तरी वरुणराजाने जिल्ह्याकडे पाठ फिरवलेली आहे. १ जून ते १७ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात ३८४.४ मिमी पाऊस होणे अपेक्षित असते. या अपेक्षित सरासरीच्या तुलनेत प्

.

कमी पावसामुळे उत्तरेतील राहुरी, श्रीरामपूर, नेवासे हे ३ तालुके रेड झोनमध्ये आले असून, उर्वरित ८ तालुके ‘येलो झोन’मध्ये, तर २ तालुके ग्रीन झोनमध्ये आहेत. केवळ अकोले तालुका अतिरिक्त पावसामुळे ब्लू झोनमध्ये आहे. सप्टेंबर महिना अर्ध्याहून अधिक संपला, तरी जिल्ह्यात या महिन्यात सरासरीच्या अवघ्या १६.२ टक्के (१३.५ मिमी) पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात सरासरी ७८.४ मिमी पाऊस होणे अपेक्षित असते. ६० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची तूट, म्हणजेच अपेक्षित सरासरीच्या ४० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस, रेड झोन मानला जातो. तर २० ते ५९ टक्के तूट (सरासरीच्या ४१ ते ७९ टक्के पाऊस) असल्यास ती मध्यम तूट म्हणजेच येलो झोन मानली जाते. राहुरी तालुक्यात ३६६.९ मिमीच्या तुलनेत केवळ १२२.४ मिमी पाऊस झाला.६६.६ टक्के तूट आहे. श्रीरामपुरात ४०४.४ मिमी अपेक्षित असताना अवघा १६८.१ मिमी पाऊस पडल्याने ५८.४ टक्के तूट आहे. नेवासे तालुक्यात ३७२.३ मिमीच्या तुलनेत १८०.६ मिमी पाऊस झाल्याने ५१.५ टक्के तूट नोंदली गेली आहे. शेवगावात ४७.२, पाथर्डी तालुक्यात ४५.२, तर राहाता तालुक्यात ४७.९ टक्के तूट आहे. अहिल्यानगर तालुक्यात ४०२.६ मिमी पावसाची गरज असताना २४०.१ मिमी पाऊस झाला असून, ४०.४ टक्के तूट राहिली आहे. जिल्ह्यात केवळ अकोले तालुक्यातच सर्वाधिक १३४ टक्के पाऊस झाला.

राहुरी तालुक्यामध्ये र्वाधिक ६६.६ टक्के पावसाची तूट

. जमिनीतील ओलावा कमी होणार . पिकांना पाण्याचा ताण येण्याची दाट शक्यता . विहिरी व भूजलपातळीवर परिणाम होऊ शकतो . रब्बी पेरण्यांना विलंब होण्याची शक्यता . पाण्याचे नियोजन अधिक महत्त्वाचे ठरते



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *