Headlines

Rohit Pawar Ultimatum To Maharashtra Govt Over MPSC Recruitment Crisis


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि आयोगाच्या कारभारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे. “सरकारने केवळ SIT आणि कृतीगटाचे कागदी घोडे नाचवू नयेत.

.

गणेशोत्सवामुळे आंदोलनाला तात्पुरती ‘ब्रेक’

सध्या राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या काळात नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि उत्सवादरम्यान सुरक्षा यंत्रणांवर अतिरिक्त ताण पडू नये, या सामाजिक जाणिवेतूनच विद्यार्थ्यांनी आणि आपण सध्या आंदोलन थांबवले असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र, हा केवळ तात्पुरता ब्रेक असून, सरकारला आपली भूमिका सुधारण्यासाठी मिळालेला हा एक आठवड्याचा वेळ आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

अध्यक्षांचा राजीनामा हीच मूळ मागणी

MPSC च्या विद्यार्थ्यांची मूळ मागणी ही आयोगाच्या ‘भ्रष्ट’ अध्यक्षांचा राजीनामा घेण्याचीच आहे आणि ती कायम राहील, असे पवार यांनी म्हटले आहे. सध्याच्या अध्यक्षांच्या (भीमनवार) कार्यपद्धतीवर विद्यार्थ्यांचा मोठा रोष आहे. त्यामुळे आता कोणतीही चौकशी समिती, SIT (विशेष तपास पथक) किंवा कृतीगट स्थापन करून वेळकाढूपणा करण्यापेक्षा थेट हकालपट्टीची ‘कृती’ सरकारने करावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.

७० हजार पदांच्या मेगाभरतीची आठवण

यासोबतच, २०२६ मध्ये तब्बल ७० हजार पदांची ‘मेगाभरती’ करण्याबाबत सरकारने जो शब्द दिला होता, त्याचीही रोहित पवार यांनी आठवण करून दिली आहे. या आश्वासनाची पूर्तता करत मेगाभरतीची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात पुन्हा आंदोलनाची ठिणगी पडणार?

येत्या आठवडाभरात म्हणजेच गणेश विसर्जनापर्यंत सरकारने अध्यक्षांचा राजीनामा आणि मेगाभरतीबाबत ठोस पावले न उचलल्यास, पुण्यात पुन्हा एकदा मोठे आंदोलन उभे राहील, असे रोहित पवार यांनी जाहीर केले आहे. या संभाव्य आंदोलनाची वेळ, स्थळ आणि दिनांक लवकरच जाहीर केला जाईल, असे सांगत त्यांनी सरकारच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे.

———

हेही वाचा..

निकषांची वाट न पाहता राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा!:शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार द्या; शरद पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

राज्यात पावसाने प्रदीर्घ काळ ओढ दिल्याने निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून तातडीच्या उपाययोजनांची आग्रही मागणी केली आहे. “शासनाने औपचारिक निकषांची वाट न पाहता गंभीर परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये त्वरित दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपयांची थेट आर्थिक मदत द्यावी आणि शेतमजुरांच्या खात्यात 25 हजार रुपये जमा करावेत,” अशा प्रमुख मागण्या पवारांनी या पत्राद्वारे केल्या आहेत. राज्यातील विविध शेतकरी संघटनांकडूनही दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्या जोर धरत असताना शरद पवारांच्या या पत्रामुळे सरकारवरील दबाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.