Headlines

मुलाची कृत्यं समोर येत असल्याने उद्धव ठाकरे सैरभैर:गोपीनाथ मुंडेंच्या नावाचा संशय म्हणजे निव्वळ भीती; अमित साटम यांची सडकून टीका




“दिशा सालियन प्रकरणात मुलाची काही कृत्यं जनतेच्या आणि समाजाच्या समोर येत आहेत का, या संभ्रमातून आणि भीतीपोटी उद्धव ठाकरे पूर्णपणे सैरभैर झाले आहेत. स्वतःचे राजकीय अस्तित्व संपल्यामुळेच ते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबाबत संशय व्यक्त करत अशी बेताल वक्तव्ये करत आहेत,” असा जोरदार हल्लाबोल भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या ‘आशीर्वाद का दिया’ आणि ‘सेवा संकल्प’ उपक्रमांतर्गत गेटवे ऑफ इंडिया येथे ‘ऑपरेशन सिंदूर’ व ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित दिव्यांची रोषणाई करण्यात आली. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित साटम यांनी दिशा सालियन प्रकरणातील सीबीआय चौकशी, दुष्काळी पंचनाम्यांवरून उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेले सवाल, पंतप्रधानांचे कार्य आणि विरोधकांच्या आरोपांवर सडेतोड उत्तरे दिली. आदित्य ठाकरेंचे कृत्य उघड होण्याची भीती; ठाकरे पूर्णपणे सैरभैर दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर होत असलेले आरोप आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबाबत व्यक्त केलेल्या संशयावर साटम यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. “स्वतःचे राजकीय अस्तित्व संपत चालल्यामुळे उद्धव ठाकरे सैरभैर झाले आहेत. आपल्या मुलाची काही कृत्यं समाजासमोर उघडकीस येत आहेत की काय, या भीतीने ते ग्रस्त आहेत. त्याच मानसिकतेतून ते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचा विषय उकरून काढून लोकांचे लक्ष भरकटवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.” “2020 मध्ये घडलेल्या घटनेची 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. यावरून स्पष्ट होते की यंत्रणा पूर्णपणे निष्पक्ष आणि पूर्वग्रहविरहित काम करत आहेत. जर या प्रकरणाचा राजकीय वापर करायचा असता, तर तत्कालीन वेळेसच गुन्हा दाखल करून किंवा अज्ञात व्यक्तींविरोधात कलम 302 लावून कोणाचेही ‘व्हिक्टिमायझेशन’ करता आले असते. कोणावरही अन्याय होऊ नये हीच सरकारची भूमिका आहे; परंतु जर तपासात कोणीही दोषी आढळला, मग तो कितीही मोठा नेता असो, तो कायद्याच्या तावडीतून सुटणार नाही,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला. बांधावर जाऊन 50 हजार विसरणाऱ्यांनी फडणवीसांवर बोलू नये; दुष्काळावरून पलटवार मुख्यमंत्र्यांनी 5 ऑक्टोबरनंतर दुष्काळाचे अधिकृत पंचनामे जाहीर करण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर “पंचांग पाहून पंचनामे करणार का?” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता. त्यावर साटम यांनी प्रत्युत्तर दिले, “शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत आणि सरसकट कर्जमाफीची मोठी घोषणा करून नंतर सत्तेत आल्यावर ती विसरून जाणाऱ्या उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.” “देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात 2017 मध्ये आणि त्यानंतरही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार कटिबद्ध असून एनडीआरएफच्या नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून थेट मदत पोहोचवली जाईल.” काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमच्यासाठी नॉन-कॉग्निझिबल पंतप्रधानांच्या वाढदिवसाला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी ‘काळा दिवस’ संबोधल्याबाबत विचारले असता साटम म्हणाले, “ते कोण आहेत? आमच्या दृष्टिकोनातून ते पूर्णपणे ‘नॉन-कॉग्निझिबल’ (अदखलपात्र) आहेत. त्यामुळे त्यांच्या निराधार आरोपांना उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नाही.” तसेच अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्या राम मंदिराबाबतच्या वक्तव्यावर बोलताना, अशा व्यक्ती केवळ प्रसिद्धी आणि टीआरपी मिळवण्यासाठी वादग्रस्त विधाने करतात, अशा अनावश्यक वक्तव्यांची दखल घेणे योग्य नाही, असे ते म्हणाले. मोदीजींच्या नेतृत्वात भारताची जागतिक भरारी; देशभरात ‘आशीर्वाद का दिया’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील प्रत्येक बूथवर ‘आशीर्वाद का दिया’ हा उपक्रम राबवला जात असून गेटवे ऑफ इंडिया येथेही भव्य दीपप्रज्वलन करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील ऐतिहासिक कामगिरीचा पाढा वाचताना साटम म्हणाले, स्वातंत्र्यानंतर कित्येक दशके अंधारात असलेल्या देशातील 18,500 गावांपर्यंत मोदीजींनी वीज पोहोचवली. देशातील 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या (BPL) बाहेर काढण्याचे ऐतिहासिक काम केले. भारताच्या अर्थव्यवस्थेला डळमळीत अवस्थेतून बाहेर काढून जगातील अव्वल चार अर्थव्यवस्थांमध्ये आणले. 2029 पर्यंत भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनून जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनेल. नवा भारत – ‘घुसेगा भी और घुस के मारेगा भी’ देशाच्या सुरक्षेसाठी मोदींनी कणखर परराष्ट्र धोरण राबवले. “हा नवा भारत आहे; भारतावर हल्ला झाल्यास हा देश घरात घुसेलही आणि घुसून मारेलही. ‘माय वे’ (देशहिताचा मार्ग) याच तत्त्वावर आमचे परराष्ट्र धोरण चालेल,” असा ठाम संदेश त्यांनी जगाला दिला. कोविड संकटात स्वदेशी बनावटीची लस तयार करून 150 कोटी भारतीयांचे अवघ्या 6 महिन्यांत लसीकरण केले. इतकेच नव्हे, तर ‘वसुधैव कुटुंबकम’चा विचार जपत जगातील 92 देशांना लस पाठवून लाखो जीवांचे रक्षण केले. 2047चे विकसित भारताचे स्वप्न स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षात, म्हणजेच 2047 पर्यंत भारताला पूर्ण विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पाने पंतप्रधान काम करत आहेत. अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या अशा नेतृत्वाला दीर्घायुष्य आणि शक्ती मिळावी, हीच प्रार्थना देशातील जनता करत आहे. —————— हेही वाचा… SIT चे कागदी घोडे नकोत, थेट MPSC अध्यक्षांची हकालपट्टी करा!: रोहित पवारांचा सरकारला आठवडाभराचा अल्टिमेटम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि आयोगाच्या कारभारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे. “सरकारने केवळ SIT आणि कृतीगटाचे कागदी घोडे नाचवू नयेत. MPSC च्या भ्रष्ट अध्यक्षांची तत्काळ हकालपट्टी करावी आणि आश्वासनाप्रमाणे ७० हजार पदांची मेगाभरती सुरू करावी. तसे न केल्यास गणेश विसर्जनानंतर पुण्यात पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी सरकारला आठवडाभराची मुदत दिली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *