![]()
येथील सकल सुतार समाज संघटनेच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा प्रकट दिन गुरुवारी भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे संपूर्ण पिशोर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. सकाळी सिल्लोड नाका येथून भगवान श्री विश्वकर्मा यांच्या भव्य प्रतिमेची रथयात्रा काढण्यात आली. ही मिरवणूक बसस्थानक, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, मुख्य बाजारपेठ, दत्त मंदिर, बालाजी मंदिर आणि सिद्धेश्वर महादेव मंदिर या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत भगवान विश्वकर्मा मंदिरात पोहोचली. ‘भगवान श्री विश्वकर्मा महाराज की जय”च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने परिसर भक्तिमय झाला होता. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली ती महिलांची भव्य कलश यात्रा. पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर तुळशी वृंदावन आणि कलश घेऊन शेकडो महिला या यात्रेत सहभागी होत्या. ठिकठिकाणी महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून मिरवणुकीचे औक्षण केले. यात्रेदरम्यान महिलांनी खेळलेल्या फुगड्या व पारंपरिक पावलांमुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला. रथयात्रा विश्वकर्मा मंदिरात पोहोचल्यानंतर धार्मिक विधी पार पडले आणि त्यानंतर भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी सकल सुतार समाज उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य, महिला, युवक व समाजबांधवांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यास पिशोरसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रथयात्रा विश्वकर्मा मंदिरात पोहोचल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात रथयात्रा विश्वकर्मा मंदिरात पोहोचल्यानंतर धार्मिक विधी पार पडले आणि त्यानंतर भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी उत्सव समितीच्या वतीने सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली ती महिलांची भव्य कलश यात्रा. पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर तुळशी वृंदावन आणि कलश घेऊन शेकडो महिला या यात्रेत सहभागी होत्या. ठिकठिकाणी महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून मिरवणुकीचे औक्षण केले. यात्रेदरम्यान महिलांनी खेळलेल्या फुगड्या व पारंपरिक पावलांमुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.
Source link
पिशोर येथील सकल सुतार समाजातर्फे टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये कलश यात्रा:भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन, विविध धार्मिक कार्यक्रम