Headlines

बिहारमध्ये मुलीला बॅड टच करणाऱ्याचे एन्काउंटर:जमुईत पळून जाताना पोलिसांनी पायात मारली गोळी; आतापर्यंत 6 अटकेत




बिहारमधील जमुई येथे अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या मुख्य आरोपी नंदन यादवचे पोलिसांनी एन्काउंटर केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी त्याच मडवा टेकडीच्या आसपास लपून बसला होता, जिथे दोन्ही विद्यार्थी फिरायला गेले होते. पोलिसांनी घेराव घालून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चकमक झाली. पोलिसांनी नंदनच्या डाव्या पायावर गोळी मारली आहे. त्याला सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओमध्ये लाल गमछा घातलेला दिसणारा युवक हाच नंदन यादव आहे. या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी तिघांचे वय ३५ ते ४० वर्षे आहे, तर तिघे अल्पवयीन आहेत. एडीजी कायदा व सुव्यवस्था सुहिता अनुपम यांनी सांगितले, ‘नंदन यादव पोलिसांपासून बचाव करून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलिसांशी चकमक झाली आणि त्याच्या पायाला गोळी लागली. या प्रकरणात काही आरोपी अल्पवयीनही होते. पोलिसांनी जमुई प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली आहे.’ व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करणाऱ्याला अटक यापूर्वी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीची ओळख रामाशीष चौधरी अशी झाली आहे. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवून ही कारवाई केली आहे. 19 सप्टेंबर रोजी घडली होती घटना बिहारमधील जमुई येथे विद्यार्थिनीची रस्त्याच्या मधोमध छेडछाड करून अश्लील चाळे करण्यात आले. आरोपींनी तिच्या मित्राला शिवीगाळ करून मारहाण केली. एवढेच नव्हे, तर विद्यार्थिनीसोबत केलेल्या आक्षेपार्ह कृत्याचा व्हिडिओही बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. खासगी अवयवांना केला होता स्पर्श मडवा टेकडीवर फिरायला गेलेल्या दोन्ही विद्यार्थ्यांशी तब्बल 1 तास अभद्र वर्तन करण्यात आले. यावेळी दोघांनी पळून जाण्यासाठी अनेक वेळा संघर्ष केला. पण नंदन यादव याने विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला मागून पकडले. व्हिडिओत आरोपी विद्यार्थिनीसोबत जबरदस्ती करताना दिसत आहे. आरोपीने आधी विद्यार्थिनीला मागून पकडले, त्यानंतर तिच्या खासगी अवयवाला हात लावत तिला मांडीवर उचलून घेतले. ही घटना पाहून विद्यार्थी आपल्या मैत्रिणीला वाचवण्यासाठी तिथे धावून जातो. तिला आरोपीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करतो. दोघांमध्ये झटापट होते. विद्यार्थी कसातरी आपल्या मैत्रिणीची सुटका करतो. यानंतरही आरोपी दोघांना त्रास देताना आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. दोन्ही मुले सतत तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत राहतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *