Headlines

Rohit Pawar Accuses Pune Police; MPSC Paper Leak Protest on 27th



एमपीएससी परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. विविध विरोधी पक्षांनी मोर्चे तसेच आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न उपस्थित करत आहेत. तसेच आता त्

.

पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, तुझ्यावर फायर ऑडिट करतो, तुझ्यावर स्ट्रक्चरल ऑडिटच करतो, तू जर तिथे मोर्चाला पाठिंबा दिला तर तुझ्यावर कारवाईच करतो, अशी चर्चा सीपी साहेबांनी की त्यांच्या दुसऱ्या अधिकाऱ्यांनी केली हे आम्हाला माहीत नाही, पण ही चर्चा झाली. त्यानंतर 6 ते 7 क्लास चालकांवर आता फायर ऑडिटच्या कारवाया झालेल्या आहेत. त्यामुळे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मग कुठेतरी आम्ही बोलत असताना हेच बोलत आहोत की अध्यक्षांना वाचवण्याचा प्रयत्न काही सरकारमधल्या प्रमुख नेत्यांकडून केला जात आहे आणि वापर पुणे पोलिसांचा केला जात आहे. सगळेच पोलिस प्रशासन खराब आहे असे आम्ही म्हणत नाही.

सरकारने पुढच्या 5 दिवसांत सकारात्मक निर्णय घ्यावा

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, 27 तारीख ठरली असून सकाळी 10 वाजता एसएम जोशी रोडवर इथे यांचे आंदोलन होणार आहे. पण तोपर्यंत मुख्यमंत्री साहेब आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना असे वाटले की विद्यार्थ्यांशी चर्चा करावी तर फक्त विद्यार्थ्यांची यादी आम्ही प्रशासनाला दिली आहे. हे आंदोलन किती दिवस चालेल हे आम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही विद्यार्थ्यांवर कारवाई करत आहात. आम्ही आंदोलन करणार आहोत, हे ठिय्या आंदोलन आहे, उपोषण नाही. काही विद्यार्थी उपोषण करायला देखील तयार आहेत. पण विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत असताना आम्ही उपोषण नको म्हटले आहे. त्यामुळे सरकारने पुढच्या 5 दिवसांत सकारात्मक निर्णय घेत आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत.

MPSC अध्यक्षांच्या विरोधात नवीन पुरावे

रोहित पवार म्हणाले, आता अध्यक्षांना काढा हे आम्ही का म्हणत आहोत हे याआधी आम्ही पुरावे दिले आहेत. आता नवीन पुरावे समोर आणले आहेत. ते RTO कमिशनर असताना जे काही भ्रष्टाचार केला होता, त्याचे नवीन पुरावे आमच्या हाती आले आहेत. यावर मी नंतर पत्रकार परिषद घेणार आहे. हे पुरावे सध्या आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत. आमच्या मागण्या मान्या केल्या तर मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार आम्ही करू. कारण आमच्या या मागण्या रास्त आहेत.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, हे विद्यार्थी प्रामाणिक आहेत, ते मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यावर सगळ्या विद्यार्थ्यांना ते सांगतील. या आधी जे कोणी मुख्यमंत्र्यांना भेटले होते, त्यानंतर काही विद्यार्थी 5-5 दिवस मोबाइल बंद ठेऊन गायब होते. हे आता चालणार नाही, असे पवारांनी स्पष्ट केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *