![]()
यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने माळशिरस तालुक्याची अवस्था बिकट झाली असून खरीप पेरणी केवळ ६० टक्के झाली होती तीही लांबलेल्या पावसाने जळून गेली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तर अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
.
उसाच्या लागवडी २१६८५ हेक्टर क्षेत्रावर होणे अपेक्षीत असताना फक्त ४६६५ हेक्टर क्षेत्रावर आडसाली उसाची लागवड झाली आहे.२६७६ हेक्टर क्षेत्रावर चारापिके तर ८१२ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड झाली आहे.यावर्षी फळबागा तर केवळ १७० हेक्टर क्षेत्रावरच लागवड झाली आहे. तालुक्यातील १० गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. सध्याही पावसाळ्याच्या अखेरीस पिंपरी, पठाण वस्ती, गारवाड, कोथळे या गावांना सलग पाण्याचे टँकर सुरू आहेत. प्रतिनिधी | सांगोला पावसाने पाठ फिरवल्याने सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सप्टेंबरचा मध्य उलटूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने तालुक्यातील जलसाठे कोरडे पडले आहेत.
जलसंधारण लघुपाटबंधारे विभागाचे सुमारे २०० आणि जिल्हा परिषदेचे ११८, असे तब्बल ३१८ तलाव पाण्याविना आहेत. दरम्यान, शिरभावी व ८१ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून सध्या ३७ गावांना पाणीपुरवठा सुरू असून, ११ गावांना ११ टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. पावसाने आणखी दडी मारल्यास टँकर तसेच शिरभावी योजनेतून पाणीपुरवठा करावा लागणाऱ्या गावांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील शिरभावी व ८१ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवरही थकबाकीचे संकट निर्माण झाले आहे. ऑगस्ट २०२६ अखेर ५७ गावांकडे तब्बल १ कोटी ६४ लाख १२ हजार ५५७ रुपये थकबाकी आहे. वाढत्या थकबाकीमुळे योजनेची देखभाल, दुरुस्ती आणि नियमित खर्च भागवण्यावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात उन्हाळ्यातही नियमित पाणीपुरवठा करणारी योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जाते.
शिरभावी पाणीपुरवठा योजनेतून ३७ गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. जलसंधारण लघुपाटबंधारे विभागांतर्गत तालुक्यात सुमारे २०० लघुपाटबंधारे तलाव आहेत. या तलावांच्या पाण्यावर परिसरातील सुमारे तीन हजार हेक्टर शेती क्षेत्राचा आधार आहे. मात्र, यंदा पावसाअभावी हे तलाव भरलेच नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील ११८ तलावांचीही अशीच अवस्था असून, बहुतांश तलाव सध्या कोरडे पडले आहेत.चिंचोली तलावातही पाण्याचा थेंब नाही.
तालुक्यातील माण नदीपात्रही कोरडे पडले असून, उपलब्ध स्थानिक जलस्रोत आटत चालले आहेत. पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. तलाव, बंधारे आणि स्थानिक जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाची आणखी प्रतीक्षा करावी लागल्यास उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून असलेल्या शेती क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता परतीच्या पावसाकडे लागले आहे. निमगाव येथील शेतकऱ्याचे पावसाअभावी जळून चाललेले मकेचे पीक
तालुक्यातील गिरझणी तलावावरून गिरझणी, आनंदनगर, बागेचीवाडी या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या तलावात नीरा उजवा कालव्याचे पाणी सोडल्याने तो सध्या सुरू आहे. विझोरी पाणी साठवण तलावावरून यशवंतनगर, संग्रामनगर, अकलूज या शहरांचा पाणीपुरवठा होतो. तालुक्यात यंदा सरासरीच्या ५० टक्केहून कमी पाऊस तालुक्याची सरासरी सुमारे ४५० मिमी ची असताना यावर्षी पावसाळ्याचे अखेरी पर्यंत केवळ २२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या खरीप पिके पाण्याअभावी व अपुऱ्या विद्युत पुरवठया अभावी जळून गेली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा यक्षप्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे असून उसासारखी आता गळीताला जाणारी पिके तोडून जनावरे जगवावी लागत आहेत.
दररोज १६ खेपा, अन्य गावांचाही टँकरसाठी प्रस्ताव तालुक्यातील ११ गावांमधील १८,७३६ नागरिकांना ११ टँकरद्वारे १६ खेपा करून दररोज सुमारे तीन लाख लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. कमलापूर, चिंचोली आणि चिनके येथे प्रत्येकी दोन खेपा, तर राजापूर, गुणाप्पावाडी, वाणीचिंचाळे, वासुद, डोंगरगाव येथे प्रत्येकी एक खेप सुरू आहे. वाढेगाव, जुजारपूर आणि हणमंतगाव येथे दीड खेप पाणीपुरवठा केला जात आहे. आता घेरडी, सोनलवाडी, मानेगाव, आलेगाव, जुजारपूर आणि वाणीचिंचाळे या गावांसाठीही टँकरने पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत.