Headlines

विद्यार्थिनींवर प्रेग्नन्सी टेस्टची सक्ती नको:आदिवासी विद्यार्थिनींच्या प्रेग्नन्सी टेस्टकरवून घेणाऱ्यांवर कारवाई- मंत्री उईके




सुट्ट्यांहून परतणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची प्रेग्नन्सी टेस्ट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी उघडकीस आणल्यानंतर मेडिकल सर्टिफिकेटच्या नावाखाली प्रेग्नन्सी टेस्ट करवून घेणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. आदिवासी विकास विभागाच्या अशा कोणत्याही सूचना नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. दरम्यान, कोणत्याही शासकीय रुग्णालयात आदिवासी विद्यार्थिनींची सक्तीने प्रेग्नन्सी टेस्ट करण्यात येऊ नये या सूचना देण्यासाठी आदिवासी विकास आयुक्तांनी राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तांना पत्र लिहिले आहे. गणपतीच्या सुट्टीनंतर सोमवारी २१ सप्टेंबरला घोटी, कळवण या ग्रामीण रुग्णालयांमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या रांगा लागल्या होत्या. अनेक पालक त्यांच्या मुलींना घेऊन आले होते. समोरील दुकानातून अर्ज खरेदी करून मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसाठी त्या आल्या होत्या. त्यात रक्त आणि लघवी या दोन टेस्ट ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करवून घेतल्या जात होत्या. युरिन प्रेग्नन्सी टेस्टद्वारे त्यांची तपासणी करून नो प्रेग्नन्सीचे शिक्के मारलेले वैद्यकीय अहवाल त्यांना दिले जात होते. याची खूप लाज वाटते, पण तुमच्या सुरक्षेसाठी, पुढील शिक्षणासाठी हे गरजेचे असल्याचे आपल्याला आश्रमशाळा अधीक्षकांनी, शिक्षकांनी सांगितल्याचे त्या म्हणाल्या. याची चौकशी करण्याचे आदेश आदिवासी विकास मंत्र्यांनी दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *