![]()
अनंत चतुर्दशीला जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी किंवा खासगी कार्यालयासोबतच शाळांनाही अधिकृत सार्वजनिक सुटी जाहीर केलेली नाही. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी महापालिका, विभागीय आयुक्तालय व जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व कार्यालये नियमित वेळेनुसार सुरूच राहतील. राज्य शासनाच्या वार्षिक सुट्ट्यांच्या कॅलेंडरमध्ये अनंत चतुर्दशीची कोणतीही सुटी नमूद नाही. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीही यासंदर्भात कोणताही आदेश काढलेला नाही. तसेच शाळांसाठी मुख्याध्यापकांच्या अधिकारात २ सुट्यांचे अधिकार असतात. परंतु त्या बहुतांश ठिकाणी महालक्ष्मीच्या वेळी देण्यात आल्या होत्या. ज्या शाळांनी त्या वेळी सुटी घेतली नाही, ते मुख्याध्यापक अनंत चतुर्दशीची सुटी जाहीर करू शकतात. दरम्यान, शुक्रवारी सार्वजनिक सुटी नाही. सर्व कार्यालये नियमित सुरू राहणार आहेत. कर्मचाऱ्यांची नियमितप्रमाणे हजेरी घेणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते म्हणाले. ७०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी सुटी टाकली शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू असूनही महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक (रजिस्ट्री) कार्यालय आदी कार्यालयांतील ७०० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटी घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा कार्यालयीन कामकाजावर परिणाम हाेण्याची शक्यता आहे.
Source link
आज संभाजीनगरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू राहणार:अनंत चतुर्दशीच्या सार्वजनिक सुटीचा आदेश जारी केलेला नाही