Headlines

बांधकाम कामगारांच्या पाल्यांची बंद झालेली शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करा:पातूर तहसीलदारांमार्फत कामगार आयुक्तांना देण्यात आले निवेदन‎



महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी राबवली जाणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना प्रशासनाकडून अचानक ठप्प करण्यात आली आहे. ही बंद झालेली शिष्यवृत्ती योजना तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी. या मागण

.

​पातूर तालुका व परिसरातील ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणावर गोरगरीब व रोजंदारीवर काम करणारे नोंदणीकृत बांधकाम कामगार वास्तव्यास आहेत. अत्यंत बिकट व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे मजूर आपल्या मुलांना उच्च व दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शिष्यवृत्ती योजनेमुळे या कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी मोठा आर्थिक आधार मिळत होता. मात्र, मागील काही काळापासून प्रशासनाकडून शिष्यवृत्ती व शैक्षणिक लाभांचे वितरण पूर्णपणे ठप्प झाले आहे.

अनेक योजना प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. शिष्यवृत्ती वेळेवर न मिळाल्यामुळे तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची जुळवाजुळव करणे कठीण झाले आहे. त्यांच्या पुढील शिक्षणावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. हातावर पोट असणाऱ्या या कामगारांवर यामुळे मोठा आर्थिक ताण येत आहे. ​या गंभीर बाबीची दखल न घेतल्यास कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होईल. त्यामुळे प्रशासनाने त्वरित योग्य पावले उचलावीत. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन रितेश मनोहर फुलारी यांनी सादर केले आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.

प्रमुख मागण्या ​बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी बंद करण्यात आलेली शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना तत्काळ पूर्ववत सुरू करावी. मागील प्रलंबित असलेले सर्व शिष्यवृत्तीचे अर्ज त्वरित मंजूर करून विद्यार्थ्यांना लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी. ​शिष्यवृत्ती प्रक्रियेत सुलभता आणून विद्यार्थ्यांना वेळेवर लाभ मिळण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *