Headlines

ऑक्टोबरमध्ये १६ दिवस बँकांत कामकाज होणार नाही:४ रविवार आणि २ शनिवार वगळता विविध ठिकाणी १० दिवस बँका बंद राहतील




पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये देशातील सरकारी आणि खासगी बँका वेगवेगळ्या शहरांमध्ये एकूण 16 दिवस बंद राहतील. यामध्ये 4 रविवार आणि 2 शनिवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. RBI ने ऑक्टोबर महिन्यासाठी बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. वेगवेगळ्या राज्यांतील आणि स्थानिक सणांनुसार बँकांच्या सुट्ट्या ठरवल्या जातात. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण देशात बँका बंद राहतील. तुम्हालाही ऑक्टोबर महिन्यात बँकेत जाऊन काही काम पूर्ण करायचे असेल, तर सुट्ट्यांची ही संपूर्ण यादी पाहून घ्या… डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहतील शाखा बंद असली तरी ग्राहक आपली बँकिंगची कामे ऑनलाइन पूर्ण करू शकतील. इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, UPI, ATM, NEFT आणि RTGS यांसारख्या सेवा दररोज २४ तास सुरू असतात. NEFT आणि RTGS मध्ये काय फरक आहे?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *