Headlines

प्रा. डॉ. मंगेश कराड यांना ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार:राज्यपाल जिष्णू देव वर्मा, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या ठाण्यात गौरव होणार




एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘मराठवाडा रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मराठवाडा जनविकास परिषद, ठाणे यांच्या वतीने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. २७ सप्टेंबर) आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठवाडा जनविकास परिषद ही संस्था गेल्या १७ वर्षांपासून मराठवाड्यातील नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी मराठवाडा बहुभाषिक दिन सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाच्या सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. डॉ. मंगेश कराड यांची ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासह परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना ‘मराठवाडा मित्र’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम रविवारी सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत ठाणे येथील गडकरी रंगायतन, तलावपाळी येथे होणार आहे. या कार्यक्रमाला स्थानिक खासदार नरेश म्हस्के आणि आमदार संजय केळकर यांचीही उपस्थिती लाभणार आहे. प्रा. डॉ. मंगेश कराड हे गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली एमआयटी एडीटी विद्यापीठात शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि कौशल्यविकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *