Headlines

मराठवाड्यात रोज सरासरी 3 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले:जानेवारी ते ऑगस्टदरम्यान बीडमध्ये सर्वाधिक बळी; संभाजीनगर दुसऱ्या क्रमांकावर




मराठवाड्यात मागील वर्षी अतिवृष्टी, तर‎या वर्षी दुष्काळी परिस्थिती. या दुष्टचक्रात‎सापडलेले शेतकरी आर्थिक अडचणीत‎सापडले आहेत. मागील जानेवारी ते‎ ऑगस्ट या आठ महिन्यांत ६५३‎शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. ‎म्हणजेच सर्वसाधारण दररोज ३‎शेतकऱ्यांची आत्महत्या केल्या. यामध्ये‎कोणी गळफास घेतला, तर कोणी विष‎प्राशन करून टोकाचे पाऊल उचलले.‎ मराठवाड्यात मागील वर्षी ४९ लाख‎हेक्टरवर पेरणी झाली होती. यामध्ये‎जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात‎मका, कापूस या पिकांचे क्षेत्र अधिक‎आहे. लातूर, बीड, धाराशिव, हिंगोली,‎परभणी, नांदेड या भागात सोयाबीन,‎कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी या पिकांचे‎क्षेत्र आहे. खरीप हंगामातील पिकांच्या‎उत्पादनावरच शेतकऱ्यांकडून आर्थिक‎गणित मांडले जाते. त्यामुळे खरीप‎हंगामच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला‎जातो.मराठवाड्यात जानेवारी २६ ते‎ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत‎६५३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले‎आहे. यामध्ये सर्वात जास्त १४९ शेतकरी‎आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.‎त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर‎जिल्ह्यात आत्महत्यांची नोंद झाली आहे.‎ जिल्हानिहाय आत्महत्या,‎कंसात मदतीची संख्या‎ जिल्हानिहाय आत्महत्या, कंसात मदत‎मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या अशी : बीड‎जिल्ह्यात १४९ पैकी ७९ शेतकऱ्यांची कुटुंबे‎मदतीसाठी पात्र ठरली. छत्रपती संभाजीनगर‎१३८ (७५), जालना ६१ (३०), परभणी ४५‎(१५), हिंगोली ४४ (२४), नांदेड ८२ (५२),‎धाराशिव ८८ (६०), लातूर ४६ (२८). ६५३ शेतकऱ्यांनी टोकाचे‎पाऊल नापिकीमुळे उचलले‎ मागील वर्षीची अतिवृष्टी व यंदाचा दुष्काळ‎यामुळे खरीप पिके उद्ध्वस्त झाली. पिकांचे‎नुकसान, डोक्यावर असलेले कर्ज, मुलांचे‎शिक्षण, मुलींचे लग्न व कुटुंबाचा उदरनिर्वाह‎कसा चालवायचा या आर्थिक चिंतेतून‎नैराश्यात येऊन मराठवाड्यात आठ महिन्यांत‎६५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.‎ मदतीसाठी २२६ प्रकरणे‎अद्यापही प्रलंबित‎ मदतीसाठी मराठवाड्यात शेतकरी‎आत्महत्येची २२६ प्रकरणे अद्यापही‎निर्णयासाठी प्रलंबित आहेत. यामध्ये छत्रपती‎संभाजीनगर जिल्ह्यात ५६, जालना २४, बीड‎५४, परभणी २५, हिंगोली ६, नांदेड २८,‎धाराशिव २७, तर लातूर जिल्ह्यातील ६‎प्रकरणांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने गावपातळीवर शिबिरे घेऊन शेतकऱ्यांचे समुपदेशन करावे‎ ^मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने गावपातळीवर‎शिबिरे घ्यावीत. याशिवाय अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ताणतणाव व्यवस्थापनासाठी आवश्यक कार्यवाही करावी. यामुळे मराठवाड्यातील‎शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होर्हल. – डॉ. दीपक डोणेकर, मनसोपचारतज्ज्ञ‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *