![]()
तालुक्यातील नायगाव शिवारातील शेतजमिनीतील वहिवाटीच्या रस्त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्यास एसीबीच्या पथकाने शुक्रवारी पैठण तहसील परिसरात रंगेहाथ पकडले. दिलीप कांबळे असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून तो सध्या वडवळी सजा येथे कार्यरत आहे. मुंगी (जि. अहिल्यानगर, ता. शेवगाव) येथील एका ६८ वर्षीय शेतकऱ्याची पैठण तालुक्यातील नायगाव शिवारातील गट क्रमांक ५६ मध्ये शेती आहे. या शेतीतील वहिवाटीच्या रस्त्याची रीतसर नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी शेतकरी तलाठी कांबळे यांच्याकडे गेले होते. या कामासाठी कांबळे यांनी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पथकाने पैठण तहसील कार्यालयात सापळा रचला आणि पंचांसमक्ष हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी दिलीप कांबळे याला ताब्यात घेतले आहे. तलाठी कांबळे यास ८५ हजार रुपये पगार लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेल्या तलाठी दिलीप कांबळे यास ८५ हजार रुपये पगार आहे. सातबारावर रस्त्याची नोंद करण्यासाठी त्याने एक हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, शुक्रवारी एसीबीच्या पथकाने तहसील परिसरात सापळा रचून त्यात अटक केली आहे.
Source link
सातबारावर रस्ता नोंद करण्यासाठी तलाठ्याने स्वीकारली हजाराची लाच:पैठण तहसील परिसरात लाचलुचपतच्या पथकाची कारवाई