![]()
माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती दडपल्याचा आरोप करत शिवनाथ डावखर यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाचा शनिवारी (दि.२६) सहावा दिवस आहे. सलग अन्नत्यागामुळे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली असून, सहा दिवस उलटूनही एकाही जबाबदार अधिकाऱ्याने उपोषणस्थळी भेट न दिल्याने प्रशासनाच्या असंवेदनशील भूमिकेवर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. डावखर यांनी नाशिकच्या पालखेड पाटबंधारे विभागाकडे १ जानेवारी २०२१ पासून झालेल्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांची कागदपत्रे आणि कामांचा तपशील मागितला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करत जाणीवपूर्वक अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा त्यांचा थेट आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी डावखर यांनी केली आहे. या संदर्भात घनश्याम जाधव, ए. बी. रंदाळ आणि वैभव भागवत यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची ठाम मागणी त्यांनी लावून धरली आहे.
Source link
अन्नत्यागामुळे सहाव्या दिवशी उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली:माहिती अधिकारात माहिती दडपल्याचा डावखर यांचा आरोप