![]()
देवेंद्र फडणवीस ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते, त्यावेळी संजय राऊत यांच्या मालकाला पळता भुई थोडी झाली होती. देवाभाऊ मुख्यमंत्री नसताना त्यांच्यासोबत कोणी राहणार नाही, असे म्हणणाऱ्या तुमच्या मालकाची रात्रीची झोप त्यावेळी उडाली होती. त्यामुळे देवाभाऊंचा नाद करू नका, असा इशारा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिला आहे. नवनाथ बन पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे कशासाठी एकत्र येत आहेत? त्यांचे फोटोसेशन केवळ दाखवण्यापुरते असते. ते जर खरोखरच एकत्र असते, तर राज ठाकरेंच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेत 6 जागांवर समाधान मानावे लागले नसते. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना मुंबई मनपासाठी मदत केली होती, पण उद्धव ठाकरेंच्या पक्षानेच राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे त्यावेळी केवळ फोटो काढण्यासाठी एकत्र आला होता का, हे राऊतांनी सांगावे. शावर फक्त इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीच सत्ता राहावी, यासाठी राऊत अभियान चालवत आहेत. नवनाथ बन पुढे म्हणाले की, संजय राऊत हे गांधी कुटुंबाचे वकील आहेत, तर देवाभाऊ आणि भारतीय जनता पक्ष हा संविधानाचा वकील आहे; हाच तुमच्या आणि आमच्यामधील मुख्य फरक आहे. आम्ही संविधान, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग वाचवण्यासाठी, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली व्यवस्था टिकवण्यासाठी मैदानात आहोत. मात्र, संजय राऊत हे गांधी कुटुंबाची सत्ता कायम राहावी यासाठी वकिली करत आहेत. देशावर फक्त इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीच सत्ता राहावी, यासाठी ते अभियान चालवत आहेत. गांधी कुटुंबाची हुकूमशाही अशीच चालत राहिली पाहिजे आणि इतर कोणीही सत्तेत येऊ नये, असे राऊतांना वाटते. विरोधकांची मती चोरीला गेली नवनाथ बन पुढे म्हणाले की, विरोधकांची मती चोरीला गेली आहे, मात्र कोणतीही मतचोरी झालेली नाही. गेल्या 25 वर्षांपासून उत्तर प्रदेशात काँग्रेस सत्तेत नाही; तसेच बिहार आणि पश्चिम बंगालमध्येही ते गेली 30 वर्षे सत्तेत नाहीत. मग त्यावेळी निवडणूक आयोग दोषी होता का? त्यावेळी तुम्ही त्यावर शंका घेतली होती का? केरळ आणि कर्नाटकात तुमचे सरकार आले की निवडणूक आयोग चांगला वाटतो आणि महाराष्ट्रात किंवा बिहारमध्ये अपयश आले की निवडणूक आयोगावर टीका करायची, अशी ही नौटंकी सुरू आहे, असा घणाघात त्यांनी केला. तीन दिवसांच्या अधिवेशनाची मागणी अनाठायी नवनाथ बन पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात 15 दिवसांचे अधिवेशन कधी झाले नाही, मग आता तीन दिवसांच्या अधिवेशनाची मागणी का? सरकार खरोखरच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर विशेष अधिवेशनाची मागणी करणे पूर्णपणे अनाठायी आहे. सुप्रिया सुळे यांचा ‘एक एकर वांग्यातून कोटींची कमाई’ करण्याचा फॉर्म्युला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनाही दिला पाहिजे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. भेसळखोरांवर कारवाई होत असल्यामुळेच तुकाराम मुंढेंना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. राऊतांनी कोकणातील जमीन खरेदीवर बोलण्याआधी अलिबागमधील 19 बंगल्यांचा खुलासा करावा, असे आव्हानही नवनाथ बन यांनी दिले.
हे ही वृत्त वाचा संजय राऊतांकडून FDA कारवाईचे कौतुक:मात्र अधिकाऱ्यांवर वसुलीचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढेंकडे तातडीच्या चौकशीची मागणी अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचे राज्यभरात कौतुक होत असले, तरी या कारवाईच्या नावाखाली एफडीएचे अधिकारी हॉटेल आणि क्विक कॉमर्स व्यावसायिकांची लूट करत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी तुकाराम मुंढे यांना थेट पत्र लिहून अधिकाऱ्यांच्या ‘रेट कार्ड’ची पोलखोल केली असून, या पत्राची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवली आहे. सविस्तर वाचा
Source link