![]()
रुग्णालयातून सुटी मिळताच मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे आंतरवालीत पोहोचले. तीन महिन्यांत सरकारने काहीच केले नाही तर पाटोद्यातून मुंबईकडे निघण्याचा इशारा त्यांनी दिला. तारख सासू-सुनेने त्यांच्यावर केलेल्या टीकेबाबत जरांगे म्हणाले की, आंतरवाली ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी जीव तोडून काम केले आहे. त्यामुळे गावातील व्यक्तींनी काही बोलले तरी ते मनावर घेऊ नका. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे आंतरवाली गावात एकही प्रमाणपत्र मिळाले नाही, असा आरोप आंतरवालीतील रहिवासी ललिता तारख यांनी केला होता. जरांगेंच्या उपोषणासाठी आंतरवाली येथे लावलेला मंडप काढल्याचे त्यांनी स्वागतही केले होते. ललिता यांच्या सासूबाई गंगुबाई तारख यांनीही सुनेच्या मुद्द्याला पाठिंबा दिला होता. मंडप काढण्याचा निर्णय माझाच मंडप आणि स्टेज काढा, असे सरकार, महसूल विभाग किंवा पोलिस प्रशासनाने आपल्याला सांगितले नव्हते. आपणच हा निर्णय घेतला होता. आपले निर्णायक आंदोलन आता पाटोद्यापर्यंत गेले आहे, असे जरांगे म्हणाले. सर्वांच्या संपत्तीची चौकशी करा सोशल मीडियावर पैसे घेतल्याचे, लाखांचे पॅकेज मिळाल्याचे, तसेच प्लॉट घेतल्याचे आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर २०२३ पासून माझ्यासह संबंधित सर्वांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. कुणाच्या संपत्तीत किती वाढ झाली, हे चौकशीतून स्पष्ट होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
Source link
सरकारने 3 महिन्यांत काहीच न केल्यास पाटोद्यातून मुंबईला धडकणार- जरांगे:रुग्णालयातून सुटी मिळताच आंतरवाली गाठली, महिलांकडून औक्षण