![]()
महिन्याच्या अखेरच्या दिवशीच सप्टेंबर महिन्यातील रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली. बुधवारी (३० सप्टेंबर) शहराचे कमाल तापमान तब्बल ३६.९ अंश सेल्सियस नोंदवले गेले. हे तापमान गेल्या ३९ वर्षांतील सप्टेंबर महिन्यातील सर्वकालीन उच्चांकी तापमान ठरले असून या महिन्यात ३० पैकी २६ दिवस कमाल तापमान तिशीच्या पार होते हे विशेष, तर बुधवारी शहराचे किमान तापमान २२.२ अंश सेल्सियस होते. यंदा एल निनोच्या तीव्र प्रभावामुळे ऐन मान्सूनमध्येच शहराला उन्हाचा फटका बसला असून पावसाची उघडीप आणि हवेतील घटत्या आर्द्रतेमुळे ऑक्टोबर हीट सप्टेंबरमध्येच सुरू झाली आहे. शहरात महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा आलेख चढता राहिला होता. २७ आणि २८ सप्टेंबर रोजी कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सियस या महिन्यातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले. याशिवाय २१ सप्टेंबर रोजी ३५.६ अंश सेल्सियस, २५ सप्टेंबर रोजी ३५.४ आणि २२ सप्टेंबरला शहराचे कमाल तापमान ३४.९ असल्यामुळे या दिवशीही शहरवासीयांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागला. उगवणीसह रब्बी क्षेत्र घटेल दुष्काळामुळे ज्यांच्या शेतामध्ये पाण्याची व्यवस्था आहे असेच शेतकरी रब्बीची पेरणी करतील त्यामुळे हरभरा, करडई, ज्वारी या पिकांचे क्षेत्र आपोआप घटणार व यामुळे रब्बीचे उत्पन्नही कमी होणार असल्याचे कृषी क्षेत्रातील अभ्यासकांनी सांगितले. परतीचा जोर कमी असेल हवेचा दाब कमी होतो त्या वेळी मान्सून परतण्यासाठी चांगले वातावरण असते. १५ ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस काही ठिकाणी होईल. मात्र एल निनोमुळे त्याचा जोर कमी राहील. – डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ इतिहासातील १३ वा सर्वात कोरडा मान्सून अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली २०२६ चा मान्सून हंगाम सरासरीपेक्षा १२.६% कमी पावसासह संपला. देशातील ४३% जिल्ह्यांमध्ये यावर्षी २० ते ७२% कमी पाऊस झाला. पंजाब, हरियाणा, बिहार, महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतातील पाच राज्यांना यावर्षी पावसाच्या तुटवड्याचा फटका बसला. पूर्व भारतात, ओडिशामध्ये सरासरीपेक्षा ३०% जास्त तर महाराष्ट्रात १९ टक्के कमी पाऊस झाला. यावर्षीचा मान्सून देशातील १३ वा सर्वात कोरडा मान्सून होता आणि गेल्या ११ वर्षांतील सर्वात कोरडा मान्सून होता. जायकवाडीतून रब्बीला यंदा ४ पाणी पाळ्या प्रवीण ब्रह्मपूरकर|छत्रपती संभाजीनगर जायकवाडी धरण्याच्या रब्बीचे नियोजन १५ ऑक्टोबरच्या पाणीसाठ्यावर होणार आहे. जायकवाडी धरणात सध्या असलेल्या ८० टक्के पाणीसाठ्यामुळे ४ पाणी पाळ्या देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे ३८६ गावांतील सुमारे दीड लाख हेक्टरला आणि साधारण २ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. जायकवाडी धरणात सध्या १७५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यापैकी सुमारे ५६६ दलघमी (२० टीएमसी) पाणी रब्बीमध्ये ४ पाळ्यांसाठी देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. याबाबत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे निवृत्त सहायक अधीक्षक अभियंता जयसिंह हिरे म्हणाले की, ४ पाळ्यांमुळे दीड लाख हेक्टरवरील रब्बीतील गहू, हरभरा, फळबागा, उसाला पाणी उपलब्ध होईल. उन्हाळी हंगामात बारमाही पिकांना संरक्षणात्मक पाळी आणि आणि नदीकाठच्या गावांना पाणी देणे शक्य आहे.
Source link
संभाजीनगरात 39 वर्षांतील सर्वाधिक 36.9 अंश तापमान:यापूर्वी 26 सप्टेंबर 1987 रोजी 37 अंश होता पारा