Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:1110 कोटींचे विमा कवच; 4.25 लाख अर्जांचा हिशेब बांधावर होणार




दुष्काळाचा शिक्का बसला, शिवारातील खरीप हंगाम हातातून गेला असून आता पंचनाम्यांची लगबगही सुरू झाली आहे. मात्र जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार ६५६ विमाधारक शेतकऱ्यांच्या पदरात नेमके किती पैसे पडणार याचे उत्तर अजून बांधावरच दडले आहे. नऊ तालुक्यांत ४ लाख २५ हजार ६१९ विमा अर्जांमधून २ लाख १४ हजार ५३६ हेक्टर क्षेत्राला १११० कोटींचे विमा संरक्षण मिळाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी २४.४१ कोटी रुपये हिस्सा भरला. मात्र दुष्काळ जाहीर होणे आणि विम्याची अंतिम नुकसानभरपाई मिळणे या स्वतंत्र बाबी आहेत. अधिसूचित पिकाचे प्रत्यक्ष उत्पादन किती निघाले, त्याची निर्धारित उंबरठा उत्पादनाशी तुलना काय सांगते यावर अंतिम दाव्याचे गणित अवलंबून असून, कापणी प्रयोगांची आकडेवारी कळीची ठरणार आहे. पावसाच्या खंडानंतर पिके वाचवण्याची परीक्षा दिलेल्या शेतकऱ्यांसमोर आता विम्याची दुसरी परीक्षा आहे. पंचनाम्यांनंतर उत्पादन किती नोंदवले जाते आणि नुकसान त्या हिशेबात कितपत प्रतिबिंबित होते यावर दाव्याचे चित्र ठरणार आहे. दीपक गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उंबरठा उत्पादनातील फरक महत्त्वाचा ठरेल दुष्काळ जाहीर झाला असला तरी १,११० कोटींचे विमा कवच म्हणजे तेवढी भरपाई मिळणार असे नाही. अंतिम दावा ठरवताना अधिसूचित क्षेत्रातील प्रत्यक्ष उत्पादन आणि उंबरठा उत्पादनातील फरक महत्त्वाचा ठरणार आहे. Q. दुष्काळ जाहीर झाल्याने थेट भरपाई मिळते का? A. नाही; दावा संबंधित पिकासाठी लागू विमा तरतुदी, उत्पादनाच्या आकडेवारीनुसार निश्चित होतो. Q. यंदा पीक कापणी प्रयोगांची भूमिका काय असेल? A. अधिसूचित क्षेत्राचे उत्पादन निश्चित करण्यासाठी या प्रयोगांची आकडेवारी महत्त्वाची आहे. Q. १,११० कोटी रुपये म्हणजे मिळणारी भरपाई आहे का? A. ती विमा संरक्षित रक्कम असून दावा स्वतंत्रपणे निश्चित होईल. Q. विम्यास किती वेळ लागेल? A. तरतुदींनुसार पुढील कार्यवाही होते, त्यानुसार वेळ लागेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *