![]()
मानवाने संसार थाटामाटात करत असताना मनातील दुर्बुद्धी दूर सारून सद्बुद्धीने सद्वविचारांचे आचरण केले पाहिजे. भगवंताच्या सान्निध्यात राहून संतांचे विचार आत्मसात करणे हीच खरी मानवी जीवनाची सार्थकता आहे, असे प्रतिपादन मुर्डेश्वर देवस्थानचे मठाधिपती बालयोगी विद्यानंद महाराज यांनी केले. करंजखेड येथील गणेश गडावर अंगारक संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर इच्छापूर्ती श्री विघ्नेश्वर गणपती देवस्थान येथे श्रींचे पूजन व कीर्तन सोहळा पार पडला. या प्रसंगी शेलगाव येथील नवनाथ देवस्थानचे योगीराज महामंडलेश्वर दयानंद महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांनी भाविकांना मंदिराच्या उर्वरित बांधकामासाठी यथाशक्ती देणगी देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. या शुभप्रसंगी कमलबाई व सदाशिव जाधव छत्रपती संभाजीनगर, राणी व सुधाकर देशमुख नेवपूर तसेच लता व रवी चरावंडे बालखेड या दांपत्यांच्या हस्ते मानाची महाआरती करण्यात आली. कार्यक्रमात सावरगाव व विघ्नेश्वर भजनी मंडळाच्या वतीने आलेल्या दिंड्यांचे देवस्थानतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच योगेश नारायण देठे यांनी मंदिर बांधकामासाठी ११ हजार रुपयांची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली. संपूर्ण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी; हजारो भाविकांना साबुदाणा खिचडीचे केले वाटप सदाशिव जाधव यांच्या वतीने उपस्थित भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी राम महाराज ढमाले, संदीप महाराज पवार, बजरंग महाराज सुरांचे, ज्ञानेश्वर महाराज, चैतन्य महाराज, विकास महाराज, विघ्नेश्वर भजनी मंडळाचे बिकनी जाधव, रघुनाथ जाधव, योगेश गवारे व सचिन डामरे यांची उपस्थिती होती.
Source link
संतांचे विचार आत्मसात करणे हीच खरी जीवनाची सार्थकता- विद्यानंद महाराज:करंजखेड येथील श्री विघ्नेश्वर गणपती देवस्थान येथे संकष्टी चतुर्थी साजरी