Headlines

Bhimsen Joshi Music Festival 2026 in Pune


पुण्यातील गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवार दि. २ ऑक्टोबर ते रविवार दि. ४ ऑक्टोबर दरम्यान १३ व्या ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. औंध येथील भारतरत्न पं भीमसे

.

या तीन दिवसीय महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना किराणा घराण्याचे गायक पं. सुधाकर चव्हाण म्हणाले, “महोत्सवाचे हे १३ वे वर्ष असून आजवर आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी आपली कला या व्यासपीठावर सादर केली आहे.”

यावर्षी २ ऑक्टोबर रोजी महोत्सवाची सुरुवात किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व सुपुत्र पं. श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने होईल. यानंतर अजराड़ा घराण्याचे प्रसिद्ध तबला वादक उस्ताद अक्रम खान व झरघम खान यांची तबला जुगलबंदी उपस्थितांना अनुभविता येईल. गायिका दीपिका भिडे भागवत यांच्या गायनाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप होईल.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात किराणा घराण्याच्या युवा गायिका शाश्वती चव्हाण यांच्या गायनाने होईल. यानंतर डॉ. बिपुल कुमार राय यांचे संतूरवादन रंगेल. ख्यातनाम गायिका अनुजा झोकरकर यांच्या गायनाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप होईल.

१३ व्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी महोत्सवाच्या तिसऱ्या व शेवटच्या दिवसाची (४ ऑक्टोबर) सुरुवात पं शौनक अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र अभेद अभिषेकी यांच्या गायनाने होईल. यानंतर उस्ताद रफिक खान यांचे सतारवादन रंगेल. महोत्सवाचा समारोप विदुषी उमा टिळक यांच्या भरतनाट्यम नृत्य प्रस्तुतीने होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *