![]()
शेतीला पाणी मिळत नसल्याने ‘तुळशी गाव विक्रीला काढले आहे’ असा फलक लावून राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी अखेर प्रशासनाला पाऊल उचलावे लागले. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बुधवारी प्रत्यक्ष तुळशी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गावातील सिंचनाच्या प्रश्नावर ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत, “मी जरी मूळचा तामिळनाडूतील मदुराईचा असलो तरी मला तुळशीचा सुपुत्र मानून थोडा वेळ द्या, तुमचा प्रश्न नक्की सोडवेन,” असा शब्द त्यांनी ग्रामस्थांना दिला. तुळशी गावाला भेट देणारे एस. कार्तिकेयन हे पहिलेच वरिष्ठ सनदी अधिकारी ठरले आहेत. तरुणांच्या रोजगारासाठी प्रयत्न करू ग्रामस्थांनी चर्चेनंतर ‘गाव विक्रीला आहे’ हा फलक तात्पुरता काढण्यास संमती दिली. प्रश्न मार्गी लागला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. तुळशीमधील २५ वर्षांखालील तरुणांना सोलापूरसह विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू,असे ते म्हणाले. २३४ कोटी रुपयांच्या सिंचन आराखड्याची घेतली माहिती कार्तिकेयन यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ‘तुळशी गाव विक्रीला’ काढण्याची वेळ का आली, याची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. पाण्याअभावी शेती, पशुधन, पिण्याचे पाणी, चारा आणि पाणंद रस्त्यांसह विविध समस्यांचा आढावा घेतला. याबाबत वरिष्ठ पातळीवर दहा दिवसांमध्ये पाठपुरावा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संबंधित अधिकाऱ्यांकडून २३४ कोटी रुपयांच्या प्रकल्प आराखड्यात तुळशी गावाचा समावेश आहे का, याचीही त्यांनी माहिती घेतली.
Source link
तुळशीला भेट देणारे कार्तिकेयन पहिलेच सनदी अधिकारी:"पाणी प्रश्न सोडवेन’; ‘गाव विक्रीला’चा फलक लावणाऱ्या गावकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा शब्द