Headlines

लोकांनी भाजपकडे सत्ता दिल्याने काहींना मळमळते:माजी आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र‎




अकलूज जिल्ह्यातील सर्व संस्थांवर भाजपची एकहाती सत्ता आल्याने काही लोकांना मळमळते आहे. काही संस्थाच या मंडळींनी बुडवल्याने जिल्ह्याने भाजपवर विश्वास ठेवत सर्व संस्था आमच्या ताब्यात दिल्या आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गरळ ओकणे म्हणजे केवळ संचालक मंडळ बदलून खापर फोडण्या इतके सोपे नसते. आमदार उत्तमराव जानकर पालकमंत्र्यांच्या गळ्यात गळा घालण्याची धडपड करत असल्याची बोचरी टीका माजी आमदार राम सातपुते यांनी केली. मांडवे येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सातपुते म्हणाले, पालकमंत्री गोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मंत्री आहेत. ज्यांनी ७० वर्षे सत्तेत असूनही माळशिरस तालुक्यातील २२ गावांना अद्याप पाणी दिले नाही. तालुक्यात एमआयडीसी आणली नाही, हे पाप या लोकांनी केल्याची टीका केली. तालुक्यातील दुष्काळी २२ गावातील जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत पालकमंत्र्यांनी शब्द दिल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड. बी. वाय. राऊत, हनुमंत सूळ, बाळासाहेब सरगर, सुजयसिंह माने, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव, गणेश पाटील, आनंद शेंडगे आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *