Headlines

बनावट सीएसआर देणग्यांचे सिंडिकेट उद्ध्वस्त:मुंबई आणि 3 राज्यांत ईडीचे छापे, डॉ. धर्मेंद्र कुमारच्या रॅकेटवर टाच; महाराष्ट्र, बंगाल, गुजरात, दिल्लीत कारवाई



सामाजिक दायित्व निधीच्या (सीएसआर) नावाखाली सुरू असलेल्या आंतरराज्य आर्थिक गैरव्यवहाराचा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पर्दाफाश केला. बनावट वैद्यकीय कागदपत्रांच्या आधारे कॉर्पोरेट कंपन्यांचा सीएसआर निधी लाटून तो पुन्हा देणगीदारांपर्यंत फिरवणाऱ्या रॅके

.

यात महाराष्ट्रातील ५ व ३ राज्यांतील ८ ठिकाणांवर छापे टाकले. या साखळीचा मुख्य सूत्रधार डॉ. धर्मेंद्र कुमार हा आहे. कायद्यानुसार बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना नफ्यातील २ टक्के रक्कम सीएसआरसाठी खर्च करावी लागते. कुमारने बनावट रुग्ण, खोटे अहवाल व बोगस प्रकल्प दाखवून देणग्या मिळवल्या. हा निधी कमिशन कापून रक्कम हवाला व रोखीने मूळ देणगीदारांकडे परत पाठवली.

बोगस ट्रस्टचे विश्वस्त व हवाला मध्यस्थ रडारवर ईडीने मोहीम राबवत महाराष्ट्रातील ५ ठिकाणांसह पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्ली-एनसीआरमधील संशयित अड्ड्यांवर झाडाझडती घेतली. सूत्रधार डॉ. धर्मेंद्र कुमारसह मार्केट ऑपरेटर्स, बोगस ट्रस्टचे विश्वस्त आणि हवाला मध्यस्थ रडारवर असून त्यांच्या व्यवहारांची चौकशी सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *