Headlines

उत्सवांचा खर्च वाचवून दुष्काळग्रस्तांना मदत करा:नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भावनिक आवाहन




राज्यात यंदा पावसाने दगा दिल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे हाताशी आलेली पिके करपून गेली असून, हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा संकटकाळात आपला अन्नदाता बळीराजा दुष्काळाच्या या भीषण परिस्थितीशी दोन हात करत असताना, आगामी नवरात्रोत्सव आणि इतर सर्व सण-उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करा आणि उत्सवाचा खर्च वाचवून तो निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्या, असे भावनिक आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट करत राज्यातील जनतेला, सामाजिक संस्थांना आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ही साद घातली आहे. ‘तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क आमच्या बळीराजाचा आहे, हे मी नेहमीच सांगत आलो आहे. आमचे महायुती सरकार आणि शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने व खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. सरकार म्हणून आम्ही बळीराजाला सर्वतोपरी मदत करत आहोतच, पण एक समाज म्हणूनही आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. संकटात सापडलेल्या बळीराजाला आधार देणे ही आपली सर्वांची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे.” उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन शेतकरी चिंताक्रांत असताना धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव धुमधडाक्यात साजरे करणे योग्य ठरणार नाही, असे मत व्यक्त करत एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आणि राज्यातील जनतेला मोठे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “आगामी नवरात्रोत्सव आणि पुढील काळातील अन्य उत्सव, समारंभ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करूया. या सर्व कार्यक्रमांचा निधी दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी वळवावा, असे माझे नम्र आवाहन आहे.” शेतकऱ्यांना आधार दिल्यास या नैसर्गिक संकटावर आपण नक्कीच मात करू, असा विश्वास व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी अत्यंत मार्मिक भावना व्यक्त केल्या. “यंदाच्या उत्सवाचा खर्च वाचवून जर आपण शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसू शकलो आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकलो, तर तीच आदिशक्ती जगदंबेची खरी सेवा ठरेल,” असे सांगत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला मदतीसाठी एकवटण्याचे आवाहन केले आहे. हेही वाचा.. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा: शेती कर्जवसुलीला स्थगिती, पीक कर्ज पुनर्गठनाचे फडणवीस सरकारचे आदेश पावसाने ओढ दिल्याने महाराष्ट्रावर कोरड्या दुष्काळाचे मोठे संकट ओढवले आहे. राज्याचा जवळपास ७५ टक्के भाग दुष्काळाच्या तीव्र झळा सोसत असताना, राज्य सरकारने बळीराजाला एक मोठा दिलासा दिला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेती कर्ज वसुलीला तत्काळ स्थगिती देण्याचा शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला असून, नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *