Headlines

Radhakrishna Vikhe Patil Slams Thackeray Brothers Over CJP Protest


मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही ‘जेल भरो’चा पवित्रा घेणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीवर (CJP) आणि निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या ठाकरे बंधूंवर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटी

.

सीजेपीचे आंदोलन हे ‘आप’चेच; लोकप्रियता वाढल्याचा भ्रम

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर आंदोलनाची हाक देणाऱ्या अभिजीत दिपके आणि त्यांच्या संघटनेवर टीका करताना विखे पाटील म्हणाले, “एखाद्या विशिष्ट वातावरणात किंवा आंदोलनातून कोणती तरी संघटना उभी राहते आणि मग त्यांना भ्रम होतो की देशभरात आपलीच लोकप्रियता वाढली आहे. सीजेपीचे आंदोलन हे पूर्णपणे आम आदमी पार्टीचेच आहे. जे विचार अरविंद केजरीवाल मांडतात, तेच हे लोक बोलत आहेत. या आंदोलनामागे कोणताही जनहिताचा मुद्दा नाही. केवळ भारतीय जनता पक्ष आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणे, हाच यांचा एकमेव अजेंडा आहे. त्यामुळे या आंदोलनाला जनतेचा कोणताही पाठिंबा मिळणार नाही.”

ठाकरे बंधूंचे आंदोलन म्हणजे गेलेली पत परत मिळवण्याचा प्रयत्न

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी पुकारलेल्या आंदोलनावरही विखे पाटील यांनी जोरदार निशाणा साधला. मतदार पडताळणी मोहिमेच्या (SIR) संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने आधीच अधिकृत आणि सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. मग आता कोणत्या तोंडाने आंदोलन केले जात आहे? अशा कारणांवरून आंदोलने करून आपल्या पक्षाच्या गेलेल्या प्रतिमेला उजाळा देण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.”

शेतकऱ्यांना ताकद द्या, लोक दुवा देतील

“सध्या संपूर्ण महाराष्ट्र गंभीर दुष्काळाचा सामना करत आहे आणि महायुती सरकार शेतकऱ्यांना सावरण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. अशा संकटाच्या काळात ठाकरे बंधूंनी आपली राजकीय ताकद दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरली असती, तर जनतेने त्यांना दुवा दिला असता. मात्र, केवळ स्वतःची गेलेली राजकीय पत परत मिळवण्यासाठी ते रस्त्यावर उतरत आहेत,” अशी सडकून टीका त्यांनी केली.

दुष्काळात ‘न भूतो न भविष्यती’ मदत करणार; आमचं देणारं सरकार

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना जलसंपदा मंत्र्यांनी सरकारची भूमिका ठामपणे मांडली. “स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील सहकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. निकषांनुसार उर्वरित तालुक्यांचाही दुष्काळात समावेश करण्यात आला असून, प्रशासनाला सरसकट पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.”

एनडीआरएफपेक्षा जास्त मदत

“शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकार एनडीआरएफच्या (NDRF) निकषांपेक्षाही अधिक आर्थिक मदत करणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, वीजबिल माफी दिली आणि आताही या संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांना ‘न भूतो न भविष्यती’ अशी मदत जाहीर करेल. विरोधकांनी कितीही गलिच्छ राजकारण आणि टीका केली, तरी आमचे सरकार प्रत्यक्ष काम करणारे आणि देणारे सरकार आहे. आम्ही 100 टक्के जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”

राम शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चेवर पूर्णविराम

अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून भाजप आमदार प्रा. राम शिंदे नाराज असल्याच्या राजकीय चर्चांवर त्यांनी खुलासा केला. “राम शिंदे यांच्याशी माझे स्वतः सविस्तर बोलणे झाले आहे. त्यांच्या मनात कोणतीही नाराजी नाही. बँक निवडणुकीसाठी सध्या केवळ उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर एकत्र बसून चर्चा करण्यासाठी भरपूर वेळ आहे. ‘सहकारी संस्थांमध्ये राजकारण आणू नये’ अशी भाषणे आपण सर्वच करतो; त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवूनच ही जिल्हा बँकेची निवडणूक लढवली जाईल,” असे सांगत विखे पाटील यांनी अहिल्यानगरमधील अंतर्गत वादाच्या चर्चा फेटाळून लावल्या.

——————————————-

हेही वाचा…

पूर्णेकर हत्येच्या आरोपांवर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार:ऑडिओ क्लिप AI जनरेटेड; दिशा सालियान प्रकरणात ठाकरेंना अटक का झाली नाही?

ठाण्यातील चितळसर-मानपाडा (प्रभाग क्र. ३) येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येवरून ठाकरे गटाकडून होणाऱ्या गंभीर आरोपांवर शिवसेना (शिंदे गट) नेत्या तथा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “प्रदीप पूर्णेकर यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना असून त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मात्र, या दुःखाचा गैरफायदा घेत मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे घाणेरडे राजकारण उबाठा गट करत आहे. मूळ एफआयआरमध्ये (FIR) आमचे नाव नसताना केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एका महिलेला आणि तिच्या पतीला यात गोवण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे करत आहेत,” असा घणाघाती आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.