Headlines

केतन अग्रवाल खून:हत्या झालेल्या जागेवर 18 दिवसांपूर्वींच सियाने केतनचे पाठमोरे फोटो काढले होते; 1801 चॅट, डिलीट डेटा फॉरेन्सिकमधून रिकव्हर




५ हजार पानी आरोपपत्रात हत्येच्या पूर्वनियोजित कटाचे पुरावेलोहगड किल्ल्यावरून पडून झालेला केतन अग्रवाल याचा मृत्यू हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ हजार ५३ पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, त्यात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांच्याविरोधातील अनेक डिजिटल पुरावे मांडण्यात आले आहेत. पोलिसांच्या तपासानुसार, ३१ मे २०२६ रोजी सिया आणि केतन लोहगडावर गेले होते. ज्या ठिकाणाहून १८ जून रोजी केतनला दरीत ढकलण्यात आले, त्याच जागेवर सियाने त्याला ३१ मे रोजी उभे करून त्याचे मागून विविध फोटो काढले होते. या छायाचित्रांचा वापर खुनाच्या नियोजनासाठी झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यापूर्वी १४ जूनलाही सियाने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो फसला होता. १८०१ चॅट; ११ डिलीट संभाषणे पुन्हा मिळवली आरोपींमधील तब्बल १ ८०१ चॅटिंगचा डेटा पोलिसांनी मिळवला आहे. फॉरेन्सिकच्या मदतीने ११ डिलीट केलेले व्हॉट्सॲप चॅटही पुन्हा मिळवले आहेत. मोबाईल तपासात चॅटजीपीटी, फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटसह विविध ॲप्सवरील शेकडो संभाषणांचा आणि सर्च डेटाचा तपास केला. तपासादरम्यान पोलिसांनी ९,२०० व्हिडिओ, घटनास्थळावरील सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन आणि साक्षीदारांचे जबाब तपासले. वाढदिवसाचे नियोजन अन् सियाची गैरहजेरी १९ जूनला सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतनने महाबळेश्वरमध्ये २५ खोल्या व खासगी स्विमिंग पूल असलेले हॉटेल बुक केले होते. त्यासाठी ३ लाखांचा खर्च अपेक्षित होता व ५० हजार रुपये आगाऊ दिल्याचे सांगण्यात आले आहे. ‘जून १९ बर्थडे सेलिब्रेशन’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुपही केतनने तयार केला होता. केतनच्या मृत्यूनंतर मात्र, सिया अंत्यदर्शनासाठी आली नाही, याचे आश्चर्य वाटल्याचे मैत्रिणीने पोलिसांना सांगितल्याचे आरोपपत्रातील जबाबातून समोर आले आहे. गुन्ह्यासाठी क्राइम कंटेंटचा अभ्यास तपासानुसार, ‘बदला’, ‘चोर निकल के भागा’, ‘ऑफ सेशन’, ‘हिट : द फर्स्ट केस’, ‘इत्तेफाक’ यांसह क्राइमविषयक सामग्री आणि ‘I Was Trained to Manipulate People’ या पॉडकास्टचा अभ्यास केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. लोहगडवरील २०२५ मधील एका मृत्यूच्या घटनेची तसेच मेघालयातील राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची ऑनलाइन माहिती शोधल्याचेही आरोपपत्रातील तपासात नमूद आहे. सियाच्या व्यसनाची केतनची तक्रार १६ मे रोजी केतनने एका मैत्रिणीला सियाला दारूचे व्यसन असल्याचे व ती आपल्यावर दबाव आणत असल्याचे सांगितले. सियाने तिच्या शिक्षणाबाबत चुकीची माहिती दिल्याचेही केतनने मैत्रिणीला सांगितल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. ‘सॉरी’पासून मृत्यूनंतरच्या बातम्यांपर्यंत सर्च पोलिसांच्या मते, सियाने केतनच्या आईशी वाद झाल्यानंतर माफी कशी मागावी, तसेच पतीच्या मृत्यूनंतर दुःख व्यक्त करण्यासाठी कोणत्या भावना मांडाव्यात, याचा चॅटजीपीटीवर शोध घेतला होता. खुनानंतर माध्यमे बातम्या कशा प्रसिद्ध करतात, डिलीट केलेले चॅट पोलिस पुन्हा कसे मिळवतात, याचीही माहिती तिने इंटरनेटवर शोधली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *