![]()
वैजापूर तालुक्यातील चिकटगाव शिवारात गट नंबर १८१ मधील सामाईक बांधाच्या वादातून ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शिऊर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी समाधान कारभारी भगत (३५, रा. चिकटगाव) हे ३० सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शेतात काम करत असताना बांधावर ट्रॅक्टर का उभा केला? असे म्हणत चार नातेवाइकांनी तेथे येऊन वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयितांनी ट्रॅक्टरवर दगडफेक केली आणि समाधान भगत व त्यांचे ७० वर्षीय वृद्ध वडील कारभारी भगत यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बाळनाथ नानासाहेब भगत, सोमनाथ नानासाहेब भगत, अनिकेत बाळनाथ भगत आणि पवन बाळनाथ भगत (सर्व रा. चिकलगाव) यांच्यावर शिऊर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गंभीर जखमी कारभारी भगत यांच्यावर वैजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गुलाब मिसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बांधावर ट्रॅक्टर का उभा केला? असे म्हणत चार नातेवाइकांनी तेथे येऊन वाद घातला. त्यानंतर मारहाण करण्यात आली असल्याचे शिऊर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.
Source link
चिकटगावला सामाइक बांधाच्या वादावरून शेतकऱ्याला मारहाण:चौघांवर वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल