Headlines

बुलेटला अज्ञात वाहनाची धडक; 3 सख्खे भाऊ ठार:अहिल्यानगरमधील पुनतगाव फाट्याजवळ भीषण अपघात




नेवासे–श्रीरामपूर राज्य मार्गावरील पुनतगाव फाट्या जवळ गुरुवारी (१ ऑक्टोबर) रात्री साडे नऊच्या सुमारास बुलेट दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन सख्खे भाऊ जागीच ठार झाले. आदित्य अंबादास अहिरे (१६), दीपक अंबादास अहिरे (१४) व चैतन्य अंबादास अहिरे (१२), रा. माळीचिंचोरा, ता. नेवासे, अशी मृत भावांची नावे आहेत. तिघे भाऊ बुलेटवरून श्रीरामपूरच्या दिशेने जात असताना पुनतगाव शिवारात हा अपघात झाला. अज्ञात वाहनाने बुलेटला मागून धडक दिल्याने तिघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नेवासे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासे फाटा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, अपघात कशामुळे झाला, धडक देणारे वाहन कोणते होते, याचा तपास नेवासे पोलिसांकडून सुरू आहे. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून माहिती संकलित केली जात आहे. तीन भावंडांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने माळीचिंचोरा गावावर शोककळा पसरली असून, शुक्रवारी शोकाकुल वातावरणात तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातानंतर अज्ञात वाहन घटनास्थळावरून निघून गेले. त्यामुळे पोलिसांसमोर धडक देणाऱ्या वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान आहे. घटनास्थळावरील उपलब्ध माहितीच्या आधारे वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात वाहनाचा शोध लागल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दीपक अहिरे चैतन्य अहिरे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *