Headlines

Sanjay Raut Targets BJP Allegation; Thackeray Group Under Fire


निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या आगामी संयुक्त मोर्चावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि खासद

.

‘केवळ मोर्चाचा रस्ता नाही, वैचारिक मार्गही बदलला’

ठाकरे गटाच्या बदललेल्या विचारधारेवर निशाणा साधताना नवनाथ बन म्हणाले, “ठाकरे गटाचा मार्गातला बदल हा शिवशाहीपासून मुघलत्वापर्यंत झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या उद्याच्या मोर्चाचा फक्त रस्ता किंवा मार्ग बदललेला नाही, तर त्यांचा संपूर्ण वैचारिक मार्गच बदललेला आहे. त्यांच्या या बदललेल्या मार्गाला नाकारून महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने त्यांना आधीच घरी बसवण्याचे काम केले आहे.” हिंदुत्वविरोधी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधी विचार असणाऱ्यांना असा मोर्चा काढण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

‘मुस्लिम लीग, रोहिंग्या आणि बांगलादेशींचा पाठिंबा हवाय’

संजय राऊत यांनी या मोर्चाला महाविकास आघाडीसह डावे पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा असल्याचे म्हटले होते. यावर पलटवार करताना बन यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “संजय राऊत सांगतात की त्यांना काँग्रेस आणि शरद पवार गटाचा पाठिंबा आहे, पण खरे तर यांना आता मुस्लिम लीगचा पाठिंबा हवा आहे. यांना बांगलादेशींचा आणि रोहिंग्यांचा पाठिंबा हवा आहे. मुस्लिम लीगच्या जीवावरच आता यांची पार्टी तारणहार बनलेली आहे. त्यामुळे उद्याच्या त्यांच्या मोर्चाला मुस्लिम लीग आणि कदाचित एमआयएमचाही (MIM) पाठिंबा असेल.”

‘पाकिस्तानी पक्षाचाही पाठिंबा घेतील’

संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देशविरोधी भूमिकेचा आरोप करत बन म्हणाले, “संजय राऊत हे एखाद्या पाकिस्तानी पक्षाचा पाठिंबा घ्यायला देखील मागेपुढे बघणार नाहीत, इतकी त्यांची देशविरोधी शक्ती वाढली आहे. राहुल गांधी आणि संजय राऊत सातत्याने अशी देशविरोधी भूमिका घेत आले आहेत.”

विधानसभा निवडणुकीत जनताच उत्तर देईल

१७ सप्टेंबरनंतर देशातील वातावरण बदलत असून, लोक भाजपचा तिरस्कार करत आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. या दाव्याची हवा काढताना नवनाथ बन यांनी राऊतांना थेट आव्हान दिले. “कोण कोणाचा तिरस्कार करतंय आणि जनता कोणाच्या बाजूने आहे, हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालात स्पष्ट होईलच,” असा इशारा नवनाथ बन यांनी दिला आहे.

हेही वाचा..

पडद्यामागे हालचाली सुरू, मोदी-शहांचे संघालाही ओझे:आगामी काळात देशात राजकीय भूकंप होणार- संजय राऊत

१७ सप्टेंबरनंतर देशातील राजकीय वातावरण झपाट्याने बदलत असून, नरेंद्र मोदी हे जास्त काळ पंतप्रधानपदावर राहणार नाहीत. तसेच, आगामी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान देशात मोठी राजकीय उलथापालथ आणि भूकंप पाहायला मिळेल,” असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी देशाच्या राजकारणासह आगामी ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चाबाबत सविस्तर माहिती दिली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.