![]()
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची सायबर चोरट्यांनी ४९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ५६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बुधवार पेठेतील श्री जोगेश्वरी मंदिराजवळील एका सोसायटीत राहायला आहेत. १८ ऑगस्ट रोजी सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश पाठविला. महिलेने समाज माध्यमातील संदेश पाहिला. चोरट्यांनी महिलेला गुंतवणूक योजनेबाबत माहिती संदेशात दिली होती. गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले. त्यानंतर महिलेने १५ ते २० दिवसांत चोरट्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने ४९ लाख रुपये जमा केले. रक्कम गुंतविल्यानंतर महिलेला परतावा मिळाल्याचे भासविण्यात आले. प्रत्यक्षात महिलेला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस भिंगारदिवे तपास करत आहेत. ऑनलाइन टास्कच्या आमिषाने महिलेची ८ लाखांची फसवणूक घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेची आठ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ४२ वर्षीय महिला वारजे भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास (ऑनलाइन टास्क) चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. सायबर चारेट्यांनी सुरुवातीला महिलेला एक काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा दिला. परतावा मिळाल्याने महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून रक्कम गुंतविण्यास सांगितली. महिलेने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केली. चोरट्यांनी महिलेला परतावा दिला नाही. पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान तपास करत आहेत.
Source link
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक:सायबर चोरट्यांनी 49 लाख लुटले; विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल