![]()
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या रणधुमाळीला आता पूर्णपणे वेग आला आहे. जागावाटपाच्या जोरदार रस्सीखेचात आघाडी घेत काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून, पुणे शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार जयंतराव आसगावकर यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे, महायुतीमधील अंतर्गत पेच संपुष्टात आला असून पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा अखेर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) पारड्यात पडली आहे. भाजपने या मतदारसंघातून श्री विवेकानंद स्वामी शिक्षण संस्थेचे संचालक कौस्तुभ गावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्याने पुण्यात आता थेट आणि चुरशीची लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 6 ऑक्टोबर असून, येत्या 23 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप थेट आमनेसामने पुणे शिक्षक मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी (भाजप, शिवसेना-शिंदे गट आणि राष्ट्रवादी-अजित पवार गट) दावा ठोकल्याने पेच निर्माण झाला होता. शिंदेसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे हेदेखील उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करत होते. मात्र, अखेरच्या चर्चेत ही जागा भाजपने आपल्याकडे खेचून आणली. भाजपकडून कौस्तुभ गावडे मैदानात शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असणारे कौस्तुभ गावडे यांना भाजपने संधी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गावडे म्हणाले, “शिक्षकांना केवळ पोकळ आश्वासने न देता ठोस जाहीरनामा देणार आहे. जुनी पेन्शन योजना (OPS) आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यावर माझा भर असेल. गेल्या सहा वर्षांत विद्यमान आमदारांना जे जमले नाही, ते काम करून दाखवू.” काँग्रेसकडून जयंतराव आसगावकरांवर पुन्हा विश्वास शिक्षक मतदारांमध्ये दांडगा संपर्क असलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत दिनकर आसगावकर यांना पक्षाने दुसऱ्यांदा मैदानात उतरवून आपली बाजू भक्कम ठेवली आहे. काँग्रेसची उमेदवारी यादी जाहीर; वंजारी अन् पोहरेंना संधी विधान परिषदेच्या रिंगणात उतरताना काँग्रेसने तीन प्रमुख मतदारसंघांत आपले पत्ते उघड केले आहेत. महायुतीतील संभाव्य जागावाटपाचे सूत्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये उर्वरित जागांचे वाटप जवळपास निश्चित झाले आहे. निवडणूक होणारे 5 मतदारसंघ व निवृत्त होणारे सदस्य: उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने आता सर्वच पक्षांनी प्रचाराची यंत्रणा वेगाने कामाला लावली असून, पदवीधर व शिक्षक मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
Source link
पुणे शिक्षकमध्ये काँग्रेसचे आसगावकर विरुद्ध भाजपचे कौस्तुभ गावडे:महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा सुटला, विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला रणसंग्राम!