Headlines

Maharashtra Monsoon Withdrawal Update; Mumbai Weather Forecast 2026


राज्यात यंदा पावसाचा हंगाम आता संपण्याच्या मार्गावर आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांतून मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत संपूर्ण महा

.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांतून मोसमी वारे माघारी फिरले आहेत. मुंबईसह इतर काही भागांतही मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यातील पावसाळ्याचा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

दरम्यान, मान्सूनची माघार सुरू झाली असली तरी काही ठिकाणी परतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हवामान विभागाकडून पावसाच्या स्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. पावसाळा संपत असल्याने शेती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि आगामी पिकांच्या नियोजनाच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे.

पुढील 48 तासांत 13 राज्यांतून मान्सून परतणार

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत देशातील 13 राज्यांच्या काही भागांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशातील उर्वरित भाग, गुजरात, मध्य प्रदेशातील बहुतांश भाग, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा समावेश आहे.

एकीकडे उत्तर आणि मध्य भारतातून मान्सून माघारी फिरत असताना दक्षिण भारतातील काही भागांत मात्र पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील काही भागांत जोरदार पाऊस, तर केरळमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यंदा देशात सरासरीपेक्षा 12.6 टक्के कमी पाऊस

यंदाच्या मान्सून हंगामात देशभरात अपेक्षेपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशात दीर्घकालीन सरासरीच्या 87.4 टक्के पाऊस झाला. या कालावधीत साधारणपणे 868.6 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा प्रत्यक्षात 759.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

यामुळे देशात यंदा सरासरीपेक्षा 12.6 टक्के कमी पाऊस झाला. 2001 नंतरचा हा देशातील चौथा सर्वात कमी पावसाचा मान्सून हंगाम ठरला आहे. त्यामुळे मान्सूनची माघार सुरू होत असताना पावसाच्या कमतरतेचा परिणाम शेती आणि पाणीसाठ्यावर किती होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

हेही वाचा…

बुलढाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली:जमीन विकली, पत्नीची पोत गहाण ठेवली, तरी कर्ज फिटेना; चिठ्ठी लिहून आत्महत्या

शेतीतील नुकसान, सततची नापिकी आणि डोक्यावर वाढत जाणारे कर्ज यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर येथे शंकर रामभाऊ भारसाकळे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत कर्ज फेडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. स्वतःची जमीन विकली, एक वावर गहाण ठेवले, पत्नीची पोतही गहाण ठेवली; मात्र तरीही कर्ज फिटले नसल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.