Headlines

पुण्यात इंग्रजी शिक्षणाच्या भवितव्यावर जागतिक मंथन:‘इएलटीआय’ची आंतरराष्ट्रीय परिषद 7 ते 10 ऑक्टोबरला; एआय, एनईपी 2020 वर चर्चा




कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२०, बहुभाषिक शिक्षण आणि बदलत्या अध्यापन पद्धतींच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी भाषा व साहित्य शिक्षणाच्या भवितव्यावर पुण्यात जागतिक मंथन होणार आहे. भारतीय इंग्रजी भाषा शिक्षक संघटना आणि एमआयटी-एडीटी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इएलटीआय’ची २० वी आंतरराष्ट्रीय व ५६ वी वार्षिक परिषद ७ ते १० ऑक्टोबरदरम्यान लोणी-काळभोर येथे आयोजित करण्यात आली आहे. ‘English on the Edge: Survive? Evolve? Thrive?’ या मध्यवर्ती विषयावर होणाऱ्या परिषदेत भारतातील सुमारे एक हजार इंग्रजी शिक्षक व प्रतिनिधी, तसेच विविध देशांतील ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्वान सहभागी होणार आहेत. जनरेटिव्ह एआयमुळे लेखन, भाषांतर, वाचन, मूल्यमापन आणि अध्यापनाच्या पद्धतींमध्ये होत असलेले बदल हा चर्चेचा प्रमुख विषय राहणार आहे. परिषदेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. ब्रिटिश कौन्सिल, केंब्रिज विद्यापीठ तसेच विविध देशांतील शिक्षणतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. समारोपासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर यांनी दिली. एआयच्या वाढत्या वापरामुळे मानवी सर्जनशीलता, चिकित्सक विचार आणि संवादकौशल्याचे महत्त्व कसे टिकवायचे, यावर परिषदेत चर्चा होणार आहे. संशोधन सादरीकरणे, कार्यशाळा, परिसंवाद आणि पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आली आहे. ‘रिड फेस्ट’मधून वाचनसंस्कृतीला चालना परिषदेबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ‘रिड फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार असून, वर्तमानपत्रे, प्रकाशक आणि विद्यार्थ्यांचे स्टॉल या महोत्सवात असतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *