Headlines

बँकॉकहून सौंदर्य प्रसाधनांच्या डब्यातून आणले 1 कोटीचे चरस:पुणे विमानतळावर महिला जेरबंद, तब्बल 1 किलो 243 ग्रॅमचा मुद्देमाल जप्त




सौंदर्य प्रसाधनांच्या आडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका महिलेला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून तब्बल १ कोटी रुपये किमतीचे चरस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई केंद्रीय सीमा शुल्क विभाग आणि महसूल गुप्तचर यंत्रणेच्या संयुक्त पथकाने केली. बँकॉकहून आलेल्या या महिलेने सौंदर्य प्रसाधनांच्या डब्यातून चरस आणल्याची गोपनीय माहिती कस्टम आणि डीआरआयच्या पथकाला मिळाली होती. ही महिला विमानतळावरून घाईघाईत बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. त्याच वेळी पथकाने तिला संशयावरून ताब्यात घेतले. तिच्या सामानाची कसून तपासणी केली असता त्यात सौंदर्य प्रसाधनांचे दोन डबे आढळून आले. या डब्यांमधील पदार्थाची ‘ड्रग डिटेक्शन किट’द्वारे त्वरित तपासणी करण्यात आली. यात तब्बल १ किलो २४३ ग्रॅम चरस लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. या जप्त करण्यात आलेल्या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत एक कोटी रुपये आहे. या प्रकरणी महिलेविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अमली पदार्थांची तपासणी अशी होते परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या सामानाची कस्टमकडून एक्स-रे आणि संशयास्पद वस्तूंच्या प्रत्यक्ष तपासणीद्वारे छाननीहा. एखाद्या प्रवाशावर संशय आल्यास त्याचे सामान उघडून तपासले जाते. त्यात संशयास्पद पदार्थ आढळल्यास ‘ड्रग डिटेक्शन किट’च्या साहाय्याने प्राथमिक चाचणी केली जाते. अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाल्यास ते नमुने जप्त होतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *