Headlines

विधान परिषद, भाजप 3 तर शिंदेसेना-राष्ट्रवादी प्रत्येकी 1 जागा लढणार:पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदेसेनेच्या चिवटेंचे बंड; भाजपच्या ‘नाशिक पॅटर्न’चे उट्टे काढण्याची रणनीती



विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला निवडणूक होत आहे. त्याचे महायुतीचे जागावाटप जाहीर झाले. त्यानुसार भाजप पुण्यातील शिक्षक, पदवीधर तसेच नागपूर पदवीधर तर अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेना (शिंदे) आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधरची जागा राष्ट्रवादी अजि

.

त्याचे उट्टे काढण्यासाठी पुणे शिक्षक मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी (विशेष अधिकारी) मंगेश चिवटेंनी बंडाचे निशाण फडकावले आहे. आपण मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत, असे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. ज्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यातील एकही जागा सध्या भाजपकडे नाही. तरीही त्यांनी ३ जागा खेचल्या. त्यातील पुणे शिक्षक मतदारसंघाची तयारी चिवटेंनी आधीपासून केली होती. मात्र, जागा वाटपात त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी बंडाची तयारी सुरू केली आहे.

मविआतही कुरबुर सुरू

दुसरीकडे मविआतील काँग्रेसने उद्धवसेना, शरद पवार गटाशी चर्चा न करता उमेदवार जाहीर केल्याने कुरबुर सुरू आहे. नागपूर पदवीधरसाठी विद्यमान आमदार अभिजित वंजारी, पुणे पदवीधर- जयंत आसगावकर तर अमरावती शिक्षक मतदार संघात अदिती पोहरेंना उमेदवारी दिली. त्यातील अमरावतीच्या जागेवर उद्धवसेनेने दावा केला आहे. तर, शरद पवार गट आणि उद्धवसेनेला छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) पदवीधरची जागा हवी आहे.

ही भाजपवर दबावाची खेळी

गेल्या वेळी पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघात अनुक्रमे जयंत आसगावकर (काँग्रेस), अरुण लाड (एकत्रित राष्ट्रवादी) हे विजयी झाले होते. या दोन्ही जागा भाजपला जिंकायच्या आहेत. पण महायुतीत बंड झाल्यास भाजप अडचणीत येऊ शकते. त्यामुळेच शिवसेनेकडून भाजपवर दबावासाठी बंडाचा झेंडा उभारला जात आहे. भाजप एेनवेळी शिंदेंवर दबाव टाकून चिवटेंना माघार घ्यायला लावू शकते. त्या बदल्यात पुढच्या वेळी राज्यपाल नियुक्त आमदार निवडीत चिवटेंना संधीचे आश्वासन असू शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *