Headlines

33 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड‎:विंचूरच्या विद्यार्थ्यांचे मैदानी स्पर्धेमध्ये यश




लासलगाव महाविद्यालय येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनिअर कॉलेज विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत यश संपादन केले. मैदानी क्रीडा स्पर्धेत ज्युनिअर कॉलेज विभागाने १३ क्रीडा प्रकारांत विजय मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धांमध्ये एकूण १५ क्रीडा स्पर्धांत विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच १८ विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक, तर ०९ विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवला. एकूण ३३ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या यशाबद्दल संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, रयत शिक्षण संस्था, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य राजेंद्रचांदे, मार्गदर्शक प्राचार्य नंदकुमार देवढे, उपमुख्याध्यापक वाबळे एस. एम. आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले. जाधव रुशिना, सांगळे सिद्धी, गुरसळ दुर्गा, वैराळ दिव्या, मुदगुल प्रीती, माळी सुमित, बर्डे ओम, सय्यद रेहान, जेउघाले प्रणव, गोतरणे तुषार, देहर्डे मयूर, चव्हाण प्रतीक, गुजर ऋषिकेश, माळी अलोक, बर्डे कार्तिक, माळी खुशबू, जाधव टीना, माळी गायत्री, पवार प्रतिभा, गवळी पूनम, ढमान रोशनी, मोमीन निदा, पवार समाधान, गोधडे ओम, घुले तनुजा, जाधव तृप्ती आणि भडांगे कृष्णा या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *