Headlines

दिल्ली सांभाळण्याची ताकद मराठी माणसामध्ये- दिपके:पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास भेट




महाराष्ट्र आणि दिल्ली सांभाळण्याची ताकद मराठी माणसात आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार आणि भीमनवार यांचे राजीनामे होतील. देशाच्या भविष्यासाठी आपण लढा देणे आवश्यक आहे. त्यामुळे मागे हटू नका. जास्तीत जास्त संख्येने आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांना केले. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास अभिजित दिपके यांनी रविवारी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा दिपके यांच्यासमोर मांडल्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिपके म्हणाले, विद्यार्थ्यानो त्रास सहन करून तुम्हाला आंदोलनाला बसावे लागेल. मानसिक त्रास होईल पण मागे हटू नका. सरकारकडून दाखल होणाऱ्या केसेसला घाबरू नका. तुम्हाला अटक करण्याइतके जेल आहेत का आपल्याकडे? राज्यात २० लाख मुले स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. सरकार तुम्हाला केस आणि जेलची भीती दाखवत आहे. तुम्ही अजिबात खचू नका. जंतरमंतरच्या आंदोलनावेळी आम्हाला अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागल्याची आठवण दिपके यांनी या वेळी बोलताना सांगितले. पुणे बंद पडले पाहिजे आपल्या हक्कासाठी सर्व विद्यार्थ्यांनी पुण्यातील आंदोलनात सहभागी व्हावे. पुणे बंद पडेल अशी परिस्थिती निर्माण करा. बंद करा सांगणे म्हणजे अराजकता पसरवत असल्याचे मुख्यमंत्री म्हणतील. परंतु देशाच्या भवितव्यासाठी पुण्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दिपके यांनी या वेळी बोलताना केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *