![]()
“चांदण्यात फिरण्याचे स्वातंत्र्य उरले नाही, कळ्यांना बहरण्याचे स्वातंत्र्य उरले नाही, रंगातूनही शोधती ते चेहरा जातधर्माचा… आकाशाला निळाईचे स्वातंत्र्य उरले नाही… प्रा. प्रतिभा अहिरे यांच्या या अर्थपूर्ण ओळींनी रसिक मनाची मशागत केली. बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय, त्रैमासिक तिफण आणि शिवाजी महाविद्यालय यांच्या विद्यमाने महात्मा गांधी जयंती व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. प्रा. प्रतिभा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रसिद्ध कवी डॉ. शिवाजी हुसे यांच्या हस्ते कविसंमेलनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी नेत्याने कार्यकर्त्याला असे दान द्यावे… या कवितेतून राजकीय विसंगतीवर भाष्य केले. ज्ञानेश्वर गायके यांनी दुष्काळाची दाहकता मांडली, तर श्रीराम दापके, भगीरथ अंधानेरकर यांनी मानवधर्माचा संदेश दिला, प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. कृष्णा जाधव व डॉ. रामचंद्र झाडे उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिता राठोड व प्रवीण दाभाडे यांनी केले.
Source link
कन्नडच्या बाळासाहेब पवार वाचनालयात रंगले काव्यसंमेलन:युवा कवींचा सहभाग, दुष्काळ, शेतकरी समस्यांवर भाष्य