![]()
तालुक्यातील पालोद फाटा येथील एका हॉटेलसमोर रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सिमेंट ट्रेलरने उभ्या कारला जोराची धडक दिली. या धडकेत कारमधील १५ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. दत्ता शामराव उघडे (१५, रा. पालोद, ता. सिल्लोड) असे मृत मुलाचे नाव आहे. दत्ता उघडे हा आपली आई अनिता उघडे व वडील शामराव उघडे यांच्यासोबत कारमध्ये (एमएच ०४ डीवाय ३२३८) पालोद फाट्यावरील रस्त्याच्या कडेला बसलेला होता. याचवेळी भरधाव ट्रेलरच्या (एनएल ०१ एबी ४०६२) च्या चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून कारला धडक दिली. अपघातानंतर चालक ट्रेलर घटनास्थळीच सोडून पसार झाला. अपघातात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दोन मोटारसायकलींचेही देखील नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. तर दत्ता उघडे यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. सिल्लोेड ग्रामीण ठाण्यात ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सपोनि रविंद्र ठाकरे करत आहेत. अपघातानंतर ट्रेलर चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पलायन केले. तर कारला धडक दिल्याने बाजूला असलेल्या दोन दुचाकींचेही नुकसान झाले आहे. ट्रेलर चालकाचा शोध सुरू आहे. मृत दत्ता उघडे याच्यावर पालोद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातानंतर चालक वाहन सोडून झाला पसार
Source link
भरधाव सिमेंट ट्रेलरची उभ्या कारला धडक:15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू,आई-वडील जखमी, सिल्लोड तालुक्यातील पालोद फाट्यावर घडला अपघात