Headlines

ऑनलाइन कंपन्या, मॉल संस्कृती अन् करांच्या कचाट्यावर परिषदेतून मंथन:ऑनलाइन कंपन्या, मॉल संस्कृती अन्‎करांच्या कचाट्यावर परिषदेतून मंथन‎




एका बाजूला ॲमेझॉनसारख्या ऑनलाइन कंपन्यांची आक्रमक स्पर्धा, दुसरीकडे मॉल संस्कृतीचा वाढता विस्तार आणि त्यात जीएसटीसह विविध करांचे किचकट गणित… या तिहेरी कचाट्यात छोट्या व्यापाऱ्याने बाजारात टिकायचे कसे, हा प्रश्न रविवारी वैजापुर येथे भरलेल्या मराठवाडा व्यापारी परिषदेच्या केंद्रस्थानी राहिला. यूपीआयवरील एमडीआरपासून करप्रणालीतील अडचणींपर्यंत प्रश्नांचा पाढा वाचत व्यावसायिकांनी एकजुटीची गरज अधोरेखित केली. बदलत्या बाजाराशी दोन हात करण्यासाठी तंत्रज्ञान स्वीकारण्याबरोबरच पुढची पिढी व्यापार-उद्योगात टिकविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त झाला. पद्मावती लॉन्स येथे वैजापूर चेंबर ऑफ ट्रेडर्स अँड ॲग्रिकल्चरतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले. ‘आवाज उद्योजकांचा, साथ महाराष्ट्र चेंबरची’ या भूमिकेतून लहान-मोठ्या व्यावसायिकांना सक्षम करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांचे बाजारातील अस्तित्व टिकले पाहिजे. त्यांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र चेंबर खंबीरपणे पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही अध्यक्ष रवींद्र मानगावे यांनी दिली. परिषदेला माजी अध्यक्ष मानसिंह पवार, उपाध्यक्ष सुनील किर्दक, मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी, उमेश दासरथी, सत्यनारायण लाहोटी, जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त सुमेरकुमार काळे, विजय अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आमदार रमेश बोरनारे, बाळासाहेब संचेती, हाजी अकिल शेख, रियाज शेख, विशाल संचेती, कल्याण दांगोडे, संजय निकम, काकासाहेब कोयटे उपस्थित होते. तालुकाध्यक्ष शांतीलाल पहाडे यांनी प्रास्ताविकातून स्थानिक व्यावसायिकांच्या अडचणी मांडल्या. ‘सवलतीं’समोर स्थानिक बाजाराची कसोटी मोठ्या ऑनलाइन कंपन्यांकडून मिळणाऱ्या सवलती, घरपोच सेवा आणि मॉल संस्कृतीमुळे पारंपरिक दुकानदारीसमोर नवे संकट उभे राहिल्याची चिंता परिषदेत व्यक्त झाली. किंमतीच्या स्पर्धेत छोट्या व्यावसायिकांची कोंडी होत असल्याने तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि ग्राहकांशी थेट नाते मजबूत करण्याशिवाय पर्याय नसल्याचा सूर उमटला. पुढची पिढी व्यापारात टिकणार कशी? परिषदेत केवळ आजच्या अडचणींचाच नव्हे, तर पारंपरिक व्यवसायाची पुढची पिढी टिकविण्याचाही प्रश्न चर्चेत आला. स्पर्धेचे स्वरूप बदलल्याने तरुणांनी व्यापारापासून दूर न जाता आधुनिक विक्री पद्धती, डिजिटल व्यवहार आणि नव्या तंत्रज्ञानाची जोड द्यावी. व्यवसाय बदलत्या काळानुसार बदलला, तरच पुढची पिढी बाजारात टिकेल, असा संदेश ज्येष्ठांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *