Headlines

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत द्या:सटाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन‎



शहरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांच्या रेबीज प्रतिबंधात्मक उपचारांचा खर्च नगरपालिकेने उचलावा, तसेच जखमींना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस

.

यावेळी मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील व नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांना निवेदन देण्यात आले. शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अलीकडील काळात शहरात १० ते १५ नागरिकांना, त्यात महिला व लहान मुलांचाही समावेश आहे, कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. निर्बीजीकरणावर लाखो रुपये, तरीही संख्या वाढतेय भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी नगरपालिकेकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असतानाही कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याने निर्बीजीकरण मोहिमेच्या प्रभावीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला. नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा प्रश्न केवळ कागदोपत्री कारवाई करून न सोडवता विशेष सभा घेऊन जखमी नागरिकांना उपचारासाठी आर्थिक मदत द्यावी, तसेच भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी नागरिकांना रेबीज प्रतिबंधात्मक उपचारांसाठी मोठा आर्थिक खर्च करावा लागत आहे. त्यामुळे उपचारांचा खर्च नगरपालिकेने उचलावा, अशी मागणी कार्याध्यक्ष मनोज छोटू सोनवणे यांनी केली. तर भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना, व्यापक व परिणामकारक निर्बीजीकरण मोहीम तसेच धोकादायक व आक्रमक कुत्र्यांबाबत नियमानुसार तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी साहेबराव सोनवणे यांनी केली.

यावेळी शहराध्यक्ष भारत काटके, कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, साहेबराव सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष सुमनबाई सोनवणे, मयुर अहिरे आदी उपस्थित होते.

नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाने तातडीने ठोस, परिणामकारक आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. ”-दीपिका चव्हाण, – माजी आमदार, बागलाण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *