Headlines

रोहित पवारांचे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी नसून राजकीय नौटंकी:बाहेरून माणसे आणून स्टंटबाजी सुरू, राजकीय फायद्यासाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नका- नवनाथ बन




आमदार रोहित पवार पुण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या नावाखाली केवळ राजकीय स्टंट करत असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. पुण्यामध्ये सुरू असलेले हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या हितासाठी नसून पूर्णपणे एक राजकीय कार्यक्रम आणि ‘राजकीय नौटंकी’ आहे. या आंदोलनाशी विद्यार्थ्यांचे काहीही देणेघेणे नसून, यात केवळ 20 टक्केच विद्यार्थ्यांचा सहभाग आहे, तर उरलेल्या 80 टक्क्यांमध्ये राजकीय लोकांची मोठी घुसखोरी आहे. नवनाथ बन म्हणाले की, पुण्यात सुरू असलेल्या रोहित पवारांच्या आंदोलनात खरे विद्यार्थी नाहीत, तर थेट ‘बारामती ॲग्रो’ कंपनीचे, कारखान्याचे कर्मचारी तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. रोहित पवारांच्या या आंदोलनाकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. आंदोलन यशस्वी होत नसल्याने आणि पहिले चार दिवस तिकडे कोणी फिरकले नसल्याने, रोहित पवारांनी नंतर नौटंकी करत फोन करून कंपन्या व साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना पुण्यात बोलावून घेतले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये नवनाथ बन म्हणाले की, आंदोलनासाठी पुण्याबाहेरून लोक आणण्यात आली असून तब्बल 200 ते 250 गाड्यांच्या माध्यमातून बाहेरून माणसे बोलवल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत.राजकीय फायद्यासाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी असे खेळू नये, असा कडक इशाराही त्यांनी यावेळी दिला. …हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *