Headlines

आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत, पासपोर्ट जप्त करा!:नितेश राणेंचा दावा, म्हणाले- रोहित पवारांनी तारीख-वेळ सांगावी, मी शेवटच्या श्वासापर्यंत भाजपमध्येच!




“मी शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पक्षातच राहणार आहे; त्यामुळे रोहित पवारांनी इकडे-तिकडची भाषा करण्यापेक्षा स्वतः कधी मंत्री होणार याची तारीख आणि वेळ आधी जाहीर करावी,” असा जोरदार टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी रोहित पवार, ठाकरे बंधूंचा मोर्चा, आदित्य ठाकरे, सीजेपीचे आंदोलन, एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यांवरून चौफेर हल्लाबोल केला. “अभिनेता डिनो मोरियाच्या अटकेनंतर आता आदित्य ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार आहे; त्यामुळे ते देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असून त्यांचा पासपोर्ट तत्काळ जप्त करण्यात यावा,” असा खळबळजनक पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. शेवटच्या श्वासापर्यंत भाजपमध्येच; रोहित पवारांनी तारीख-वेळ सांगावी ‘रोहित पवार मंत्रिमंडळात आले तर नितेश राणे भाजपमध्ये नसतील’, या विधानाचा समाचार घेताना राणे म्हणाले, “रोहित पवारांनी उगाच इकडे-तिकडची उत्तरे देण्यापेक्षा तारीख आणि वेळ स्पष्ट करावी. मी भाजप कधी सोडणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत भाजपमध्येच राहणार आहे.” प्रशासकीय प्रक्रियेचे भान हवे “उद्या सत्तेत आल्यावर आणि मंत्री झाल्यावर त्यांनाही समजेल की घटनात्मक पदावरील अध्यक्षांना हटवण्यासाठी काय कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्यापेक्षा त्यांना योग्य दिशा दिली पाहिजे.” आदित्य ठाकरे देश सोडून पळण्याच्या तयारीत; पासपोर्ट जप्त करा! ठाकरे बंधूंच्या मोर्चात आदित्य ठाकरे अनुपस्थित राहिल्यावरून राणे यांनी जोरदार निशाणा साधला. “दिशा सालियान प्रकरणाच्या एफआयआरमध्ये 13 वेळा नाव आले आहे आणि डिनो मोरियाला अटक झाली आहे. त्याचा म्होरक्या आदित्य ठाकरे आहे. इतर मोठे आर्थिक गुन्हेगार जसे देश सोडून पळून गेले, तसेच आदित्य ठाकरेही पळून जाऊ शकतात. त्यामुळे ते मातोश्रीवर आहेत की देश सोडून गेले, याची पोलिसांनी तपासणी करावी आणि त्यांचा पासपोर्ट तत्काळ जप्त करून लूकआउट नोटीस काढावी. मोर्चाच्या मंचावर आदित्य ठाकरे गैरहजर होते आणि तापाचे कारण पुढे केले गेले. वास्तविक पाहता, गंभीर गुन्ह्यांची चौकशी सुरू असल्यानेच अटकेच्या भीतीने ते लपत आहेत किंवा देश सोडण्याची तयारी करत आहेत,” असेही ते म्हणाले. विनापरवानगी मोर्चा काढाल तर गुन्हे दाखल होणारच ठाकरे बंधूंच्या मोर्चावर गुन्हा दाखल झाल्याच्या प्रश्नावर त्यांनी कायद्याची आठवण करून दिली. “हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतो. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे; पण विनापरवाना मोर्चे काढाल तर कायदेशीर कारवाई होणारच. ठाकरे स्वतः पुढे येत नाहीत, पण विनापरवाना मोर्चाचे नियोजन करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल झाले असून त्यांनी आता न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे.” अभिजीत दिपके मुखवटा, मागे उमर खलिद; ही पाकिस्तानचीच भाषा! पुणे बंदची हाक देणाऱ्या सीजेपीवर (CJP) आणि अभिजीत दिपके यांच्यावर त्यांनी कडक शब्दांत टीका केली. “अभिजीत दिपके हा केवळ एक मुखवटा असून त्याच्या मागे उमर खलिदची विचारसरणी आहे. देशात अराजकता निर्माण करणे ही नेहमीच पाकिस्तानची भूमिका राहिली आहे आणि तीच भाषा हे लोक बोलत आहेत.” “एसआयआर (SIR) रद्द करा आणि निवडणुकांवर बहिष्कार टाका, अशी भाषा आता बोलली जात आहे. कारण बोगस मतदार आणि रोहिंग्या-घुसखोरांची नावे वगळली जात असल्याने यांचा ‘व्होट जिहाद’ उघडा पडत आहे.” एमपीएससी प्रश्न, 13 पैकी 12 मागण्या मुख्यमंत्र्यांनी सोडवल्या नितेश राणे म्हणाले, “एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या 13 प्रमुख मागण्यांपैकी 12 मागण्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधीच पूर्ण केल्या आहेत. अध्यक्षांचे पद हे घटनात्मक असल्याने त्यासाठी ठरावीक प्रक्रिया आहे. सचिवांची तत्काळ बदली करण्यात आली असून व्ही. राधा आणि रामास्वामी यांच्या सक्षम समितीमार्फत संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ न करता शासन योग्य तोडगा काढत आहे.” दिग्विजय सिंह यांच्यावर पलटवार- सनातनवर बोलण्यापेक्षा कुराणवर बोलून दाखवा काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी हिंदुत्वावर केलेल्या टीकेला उत्तर देताना राणे म्हणाले, “दिग्विजय सिंह कधीही इस्लाम किंवा कुराणवर बोलण्याची हिंमत दाखवत नाहीत. मौलवींवर टीका करण्याची ताकद यांच्यात नाही, फक्त हिंदू धर्मावरच हे लोक बोलतात.” जिहादी विचारसरणीला काँग्रेसचे समर्थन “गजवा-ए-हिंदच्या माध्यमातून भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काँग्रेस सातत्याने पाठिंबा देत आली आहे. हा हिंदू राष्ट्र देश असून कोणत्याही प्रकारचे लँड जिहाद किंवा लव्ह जिहाद सहन केले जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी शेवटी दिला. ————————————————– हेही वाचा… दुष्काळात पिण्याचे पाणीच पहिली प्राथमिकता: विदर्भातील जंगलांत चारा पिकवणार; महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा, आंदोलनातील तोडफोडीवरून काँग्रेसला खडे बोल “शेतकरी आज दुष्काळाच्या भीषण संकटात असला, तरी तो आपले मूळ संस्कार, संस्कृती आणि अतिथीचा पाहुणचार कधीही विसरत नाही. बांधावर पाहणी करत असताना शेतकऱ्यांनी स्वतःसाठी आणलेल्या डब्यातील भाकर, ठेचा आणि झुणका आम्हाला अत्यंत प्रेमाने खाऊ घातला,” अशी कृतज्ञता व्यक्त करत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील दुष्काळी उपाययोजनांची माहिती दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *