![]()
दोन घरे फोडूनही हाती काहीच न लागल्याने चोरट्यांनी साई सृष्टी पार्कमधील एक बंद घर लक्ष्य केले. तीन चोरट्यांनी टॉमीच्या साहाय्याने घराचे लॉक तोडून पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी घरात प्रवेश केला आणि अवघ्या ५५ मिनिटांत १७ तोळे सोने व २ किलो चांदी असा सुमारे २९ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे तिन्ही चोरट्यांनी पायात चप्पल अथवा बूट न घालताच चोरी केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना पैठण रोडवरील साई सृष्टी पार्क येथे घडली असून, तिन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. फिर्यादी यांनी या प्रकरणी सातारा ठाण्यात तक्रार दिली. घराला कुलूप लावून ते समर्थनगर येथे गेले होते. तेव्हा चोरट्यांनी डाव साधला. चोरटे अनवाणी; पोलिसांकडून शोध चोरी करताना तिन्ही चोरट्यांनी पायात चप्पल किंवा बूट घातले नव्हते. अनवाणी येऊन चोरी केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिन्ही संशयित कैद झाले असून, त्यांच्या हालचाली आणि मार्गाचा तपास सुरू आहे. ५० वर्षांपूर्वीचे पारंपरिक दागिने चोरट्यांनी २ तोळ्यांचे मंगळसूत्र, १.५ तोळ्याचे मोत्यांची माळ, १.५ झुमके, २ अंगठ्या, ३ तोळ्यांचा नानू सेट, सोन्याचे लॉकेट, सोन्या-मोत्याचा सेट, सोन्याच्या बांगड्या, कानातील सोन्याचे चार जोड २९.५० लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. अवघ्या ५५ मिनिटांत चोरट्यांकडून घर साफ सीसीटीव्ही फुटेजच्या तपासात तीन चोरटे पहाटे ४.१० वाजता बोरगावकर यांच्या घरात शिरल्याचे दिसून आले. घराचे लॉक टॉमीच्या सहाय्याने तोडून त्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील लॉकरची झडती घेत सोन्या-चांदीचे दागिने आणि वस्तू ताब्यात घेतल्या. चोरीचा माल घेऊन तिन्ही चोरटे ५.१५ वाजता घराबाहेर पडले. म्हणजेच अवघ्या ५५ मिनिटांत चोरट्यांनी घर साफ केले.
Source link
छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोडी:आधी दोन घरे फोडली, त्यात काही मिळाले नाही; तिसऱ्या घरातून 29.50 लाखांचे दागिने लंपास