Headlines

रायपूर डोणगाव शिवारात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे:भरपाईची मागणी




गंगापूर तालुक्यातील रायपूर, डोणगाव, दिवशी पिंपळगाव, पाचपीरवाडी, किन्हळ, वरझडीसह अनेक गटातील शेतीशिवारात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महसूल विभागाकडून शेतात जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. या वेळी ग्राम महसूल अधिकारी सुरेश ठेंगडे, तातेराव गायके, गजाननसिंग घुनावत यांच्यासह शेतकऱ्यांच्या उपस्थित पंचनामे करण्यात आले. पंचनाम्यादरम्यान मका, सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. पावसाअभावी तसेच प्रतिकूल हवामानामुळे पिकांची वाढ खुंटून उत्पादनावर मोठा परिणाम झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात पाहणी करून नुकसानीची नोंद केली. या वेळी शेतकरी गायकवाड, कीर्तिकर, प्रकाश हरकळ, झगरे, रमेश बडुगे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पंचनामे सुरू झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *